नटवरलाल सकट यांची राष्ट्रवादीच्या शहर उपाध्यक्षपदी निवड

0
नटवरलाल सकट यांची राष्ट्रवादीच्या शहर उपाध्यक्षपदी निवड

नटवरलाल सकट यांची राष्ट्रवादीच्या शहर उपाध्यक्षपदी निवड

उदगीर (एल पी उगिले) : उदगीर येथील सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर राहिलेले युवा नेते नटवरलाल हिरालाल सकट यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या शहर उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. निवडीचे पत्र पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय शेट्टे यांनी दिले आहे.
प्रसंगी माजी आ. सुधाकरराव भालेराव, माजी आ. शिवराज तोंडशिरकर, माजी आ. धर्माजी सोनकवडे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस प्रा. डॉ. शिवाजी मुळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजिम दायमी यांच्यासह पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपल्या निवडीबद्दल बोलताना नटवरलाल सकट यांनी पक्षश्रेष्ठीचे आभार मानून पक्षाने मला ही संधी दिली, या संधीचे सोने करून पक्ष संघटन बळकटीसाठी आपण सदैव प्रयत्न करू. असे आश्वासन दिले. पक्षाने माझ्या सामाजिक आणि राजकीय कार्याचा केलेला हा गौरव आहे. असे मी समजतो. पक्ष श्रेष्ठ यांची मान खाली जाईल असे कोणतेही काम माझ्या हातून कधी होणार नाही. असा विश्वासही त्यांनी याप्रसंगी दिला. उदगीर शहरात पक्ष वाढीसाठी जे जे म्हणून करता येईल तेथे आपण करू असेही सांगितले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!