सभापती मंचकराव पाटील यांचा सत्कार
सभापती मंचकराव पाटील यांचा सत्कार
अहमदपूर (गोविंद काळे) : महेश नागरी सहकारी पतसंस्था शिरूर ताजबंद च्या चेअरमनपदी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मंचकराव पाटील यांची फेर निवड झाल्याबद्दल ह.भ.प.लालासाहेब महाराज देशमुख यांच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समिती अहमदपूर च्या कार्यालयात सत्कार करण्यात आला.
यावेळी उपसभापती संजयभाऊ पवार, वसंत महाराज चाटे, मधुकर महाराज, विविध कार्यकारी सेवा सोसायटी यल्लादेवी उमरगा चे चेअरमन तथा पत्रकार राजकुमार सोमवंशी, संचालक यशवंत केंद्रे, किशन पाटील , मुकुंद देशमुख , सचिव ओम उगीले, सहाय्यक सचिव राजेंद्र कासले यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
