बलात्कार प्रकरणात तक्रार का केली म्हणुन ४७ वर्षीय अंध महिलेवर अश्लिल कृत्य ; अहमदपूर पोलीसात दोघांविरूध्द गुन्हा दाखल

0
बलात्कार प्रकरणात तक्रार का केली म्हणुन ४७ वर्षीय अंध महिलेवर अश्लिल कृत्य ; अहमदपूर पोलीसात दोघांविरूध्द गुन्हा दाखल

बलात्कार प्रकरणात तक्रार का केली म्हणुन ४७ वर्षीय अंध महिलेवर अश्लिल कृत्य ; अहमदपूर पोलीसात दोघांविरूध्द गुन्हा दाखल

अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील हंगरगा येथील एका तेरा वर्षीय इयत्ता ७वी मध्ये शिकत असलेल्या अल्पवयीन मुक्या अपंग मुलीवर इ.स २०१८ साली एका व्यक्तीकडून बलात्कार झाला होता व त्या प्रकरणात पिडीत मुलीच्या आईने अहमदपूर पोलिसात आरोपी विरूध्द तक्रार देऊन त्यास काराग्रहाची हवा दाखवली होती त्याचाच राग मनात धरून दि ८ जुलै रोजी बलात्कार प्रकरणातील आरोपीच्या ३५ वर्षीय पुतण्याने बलात्कारीत मुलीची अंध आई स्नानगृहा मध्ये आंघोळ करीत असताना अश्लील कृत्य केले आहे यातील दोन्हीही आरोपी विरुद्ध अहमदपूर पोलिसात दि १० ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असुन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

याविषयी पोलीस सूत्राकडून समजलेली अधिकृत माहिती अशी की दि ८ जुलै रोजी अहमदपूर तालुक्यातील हंगरगा गावातीलच एका मुलाचे लग्न होते या लग्नाला गावातील सर्व लोक गेले असता गावातील नागेश मारुती जिवारे वय ३५ वर्ष हा माझ्याजवळ येऊन मला म्हणाला की काकू आंघोळ केली आहेस का मी पाठ घासून देतो त्यावर मी त्याला म्हणाले की तू काय बाई आहेस का पाठ घासायला म्हणून मी त्याला तेथुन हाकलून दिले त्यानंतर दुपारी २: ३० वाजण्याच्या दरम्यान मी माझ्या स्नानगृहा मध्ये अंघोळ करीत असताना तो तेथे आला माझ्याशी अश्लील कृत्य करण्याचा प्रयत्न केला मी अंध असल्यामुळे काही समजले परंतु मला लघवीच्या ठिकाणी जोणारे टोचत असल्याचे जाणवले मी हात लावुन चाचपुण पाहीले असता समजले की ती टोपण लावलेली काचेची बाटली आहे मी कोण आहे कोण आहे म्हणून बाहेर आले असता माझ्या नवऱ्याने व गावातील जिजाबाई कांबळे हिने नागेश जिवारे पळून जात असल्याचे सांगितले त्यानंतर गावातील प्रतिष्ठित नागरिक जयराम पाटील, तानाजी पाटील, शिवाजी पाटील व विष्णू पाटील ( पवार )यांना सदरचा घडलेला प्रकार सांगितला असता त्यांनी आमच्या मध्ये समझोता करून त्यांनी नागेश मारुती जिवारे यास माझी माफी मागण्यास सांगितले व पाया पडण्यास सांगितले त्याने माझे पाय धरल्यामुळे मिही त्याला माफही केले होते परंतु नंतर त्याच दिवशी संध्याकाळी ८: ०० वाजण्याच्या सुमारास नागेश मारुती जिवारे यांचे वडील मारुती सटवा जिवारे यांनी माझ्या घरासमोर येऊन माझ्या मुलास चार चौघांमध्ये पाय धरण्यास लावलीस असे म्हणून त्याचा राग मनात धरून दारूच्या नशेमध्ये माझ्या घरी येऊन अर्डा ओरड करून मला जिवे मारण्याच्या उद्देशाने उचलून घेऊन सिमेंटच्या रोडवर जोरात आपटले त्यामुळे माझा उजवा पाय मांडीपासून मोडला असुन मला कायमचे अपंग केले आहे पायावर उपचार करण्यासाठी एक महीण्याचा कालावधी लागल्यामुळे मी उशीरा तक्रार देत आहे अश्या आशयाच्या फिर्यादीवरून अहमदपूर पोलिसांनी नागेश मारुती जिवारे वय ३५ वर्ष रा हंगरगा ता अहमदपूर आणि मारुती सटवा जिवारे वय ६० वर्षे या दोघांवर गुरन नं ४८६ भारतीय न्याय संहिता बि.एन.एस २०२३ कलम ११७ ( २), ६४ ( २ ) के नुसार गुन्हा नोंद करण्यात आला असुन पुढील तपास पोलीस निरीक्षक भुसनुर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आनंद श्रीमंगल हे करीत आहेत.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!