उषा कांबळे यांच्या शिष्टाईमुळे कर्मचाऱ्यांना न्याय – भाकसखेडे

0
उषा कांबळे यांच्या शिष्टाईमुळे कर्मचाऱ्यांना न्याय - भाकसखेडे

उषा कांबळे यांच्या शिष्टाईमुळे कर्मचाऱ्यांना न्याय - भाकसखेडे

उदगीर (एल.पी.उगीले) उदगीर नगर परिषद अंतर्गत कार्यरत असलेल्या 254 सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगाच्या चौथ्या आणि पाचव्या टप्प्यातील रक्कम मिळावी म्हणून कर्मचाऱ्यांनी सतत पाठपुरावा केला होता. मात्र प्रशासनाकडून या संदर्भात गांभीर्याने दखल घेतली जात नव्हती. शेवटी सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेच्या वतीने काँग्रेसच्या नेत्या, माजी नगराध्यक्ष सौ.उषा कांबळे यांना भेटून कर्मचाऱ्यांची कैफियत मांडली. तेव्हा त्यांनी पुढाकार घेऊन सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे, अशी आक्रमक भूमिका घेत नगरपालिका मुख्याधिकारी सुंदर बोंदर आणि नगरपालिकेचे प्रशासक तथा उदगीर चे उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे यांची भेट घेऊन त्यांना कर्मचाऱ्यांची गाऱ्हाणी सांगितली. सेवानिवृत्त कर्मचारी हा अत्यंत अडचणीत असतो. तब्बल 254 कुटुंबाचा प्रश्न असून त्यांची जी काही रक्कम नगरपालिका देणे आहे, ती रक्कम द्यावी. त्यासाठी नगरपालिका निधीमधून सोय करावी, कारण यापूर्वी उषा कांबळे नगराध्यक्ष असताना त्यांनी नगरपालिका फंडातूनच कर्मचाऱ्यांची देणे दिलेली आहेत, आणि ती देणे त्या फंडातून देता येऊ शकतात. यासंदर्भात सविस्तर चर्चा केल्यानंतर उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे आणि नगरपालिकेचे मुख्याधिकारी सुंदर बोंदर यांनी या शिष्टमंडळाला चार दिवसाच्या आत टप्प्याटप्प्याने सातव्या वेतन आयोगाची शिल्लक रक्कम देण्याची तरतूद केली जाईल. असे आश्वासन दिले आहे. माजी नगराध्यक्ष तथा काँग्रेसच्या नेत्या उषा कांबळे यांनी गोरगरीब कर्मचाऱ्यांच्या सुखदुःखात सहभागी होत सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचा वाली बनून प्रशासनाला सहकार्य करायला लावले. एका अर्थाने त्यांच्यामुळेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा प्रश्न निकाली निघाला. त्याबद्दल सर्व सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेच्या वतीने आम्ही त्यांचे मानावे तेवढे आभार कमी आहेत. असे विचार नगरपालिका सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष शेषराव भाकसखेडे यांनी व्यक्त केले आहेत.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!