लालबहादुर शास्त्री प्राथमिक शाळेत अखंड भारत संकल्प दिवस साजरा

0
लालबहादुर शास्त्री प्राथमिक शाळेत अखंड भारत संकल्प दिवस साजरा

लालबहादुर शास्त्री प्राथमिक शाळेत अखंड भारत संकल्प दिवस साजरा

उदगीर (एल.पी.उगीले) : भारतीय शिक्षण प्रसारक संस्था,अंबाजोगाई द्वारा संचलित लालबहादुर शास्त्री प्राथमिक विद्यालयात अखंड भारत दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून शालेय समिती अध्यक्ष व्यंकटराव गुरमे, मुख्याध्यापक अंकुश मिरगुडे, प्रमुख वक्ते म्हणून सौ.देवकबाई काळे, विभाग प्रमुख सुधाकर पोलावार व श्रीमती सुरेखाबाई कुलकर्णी उपस्थित होते. सर्वप्रथम हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत प्रमुख ध्वजारोहण शालेय समिती अध्यक्ष व्यंकटराव गुरमे यांच्या हस्ते संपन्न झाले. पाहुण्यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दिपप्रज्वलन करण्यात आले.गुलाबपुष्प देऊन शाळेच्या वतीने सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या सौ.देवकबाई काळे यांनी अखंड भारत दिवस का साजरा करावा? त्यामागील पार्श्वभूमी याबद्दल सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना दिली. अध्यक्षीय समारोपपर भाषणात शालेय समिती अध्यक्ष व्यंकटराव गुरमे यांनी पूर्वी अखंड भारतामध्ये कोणकोणते देश होते.याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.सर्वांनी अखंड भारताचा संकल्प करण्याचे आवाहन केले.सुत्रसंचलन श्याम गौंडगावे यांनी तर, आभार सौ.श्रीदेवी कबाडेबाईंनी मानले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!