बाळासाहेब बिराजदार यांचा वाढदिवसानिमित्त फळ वाटप व वृक्षारोपण

0
बाळासाहेब बिराजदार यांचा वाढदिवसानिमित्त फळ वाटप व वृक्षारोपण

बाळासाहेब बिराजदार यांचा वाढदिवसानिमित्त फळ वाटप व वृक्षारोपण

उदगीर (एल.पी.उगीले) : सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब राजकुमार बिराजदार बामणीकर यांच्या वाढदिवसानिमित्त उपजिल्हा रूग्णालयात फळे व बिस्किट वाटप करण्यात आले. क्रीडांगण बामणी ता.उदगीर येथे वृक्षारोपण करण्यात आले. आपली सामाजिक जबाबदारी लक्षात घेता समाजातील प्रत्येक व्यक्तीचे व्यक्तिपरत्वे आपण काहीतरी देणे लागतो, हेच देणे आणि त्याची कृतज्ञता लक्षात घेऊन असा अगळा वेगळा वाढदिवस जीवन प्रयाग फाऊंडेशनच्या वतीने साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त रुग्णालयातील रुग्ण,रुग्णाचे नातेवाईक,रूग्णालय कर्मचारी यांना फळे वाटप करण्यात आले.तसेच समाजातील गरजू लोकांसाठी मदतीचा हात पुढे केला.यावेळी जीवन प्रयाग फाऊंडेशन चे अध्यक्ष प्रभात सूर्यवंशी,सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक बाबुराव राठोड,नितीश शिरसे,प्रभात देशपांडे,सुमित लाल,सौरभ कांबळे,संकल्प मटके,अनिल बुदृक्ष,माधव घोगरे राजेंद्र कांबळे व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!