किलबिल मध्ये विद्यार्थी संसद पदग्रहण समारंभ संपन्न

0
किलबिल मध्ये विद्यार्थी संसद पदग्रहण समारंभ संपन्न

किलबिल मध्ये विद्यार्थी संसद पदग्रहण समारंभ संपन्न

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील किलबिल नॅशनल स्कूल शाळेत नुकतीच विद्यार्थी संसद निवडणूक पार पडली . सदरील नवनिर्वाचित सदस्यांचा पदग्रहण सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे सचिव ज्ञानोबा भोसले प्रमुख पाहुणे म्हणून कृषी उत्पन्न बाजार समिती चे माजी सभापती भारत चामे, संचालक धनराज पाटील, विलास शेटे, शिवाजीराव पाटील, सतीश नवटक्के, रोटरी क्लबचे सचिव इंजी. अनिल फुलारी, वृक्षमित्र प्रा अनिल चवळे, प्राचार्य संतोष पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. विद्यार्थी दशेत निवडणूक प्रक्रिया काय असते आपले प्रतिनिधी कसे निवडले जातात याची प्रत्यक्षात माहिती मिळण्यासाठी शाळेने दर वर्षी प्रमाणे याही वर्षी विद्यार्थी सांसद निवडणूक प्रक्रिया राबवली. त्यामधे एकूण 49 उमेदवार रिंगणात उतरले होते. आपण निवडून आल्यानंतर कोणती कामे करणार आहोत याची माहिती सदरील उमेदवारांनी त्यांना प्रचारासाठी दिलेल्या दोन दिवसात विद्यार्थ्यांसमोर ती मांडली. या संपूर्ण निवडणुकीत शाळेचा हेड बॉय म्हणून वेदांत साखरे याने 314 मते तर हेड गर्ल जान्हवी शेटे हिने 267 मते घेऊन निवडणूक जिंकली तर डेप्युटी हेड बॉय म्हणून ज्ञानेश्वर लुंगारे व डेप्युटी हेड गर्ल म्हणून श्रावणी कदम यांनी निवडणूक जिंकली. शाळेमध्ये असलेल्या चार हाउस च्या निवडणुकीत मुलींमधून कॅप्टन म्हनून विधी भुतडा, आर्या साकोळे, जागृती चव्हाण, प्रेरणा लोंड तर मुलांमधून राजवीर देशमुख, हर्षद क्षिरसागर, राज ढोकाडे व सत्यवान नागरगोजे यांनी निवडणूक जिंकली तर व्हॉईस कॅप्टन म्हणून श्रेया भुतडा, प्रणिती पाटील, दिव्या हांडे, स्वराली कोदळे व मुलांमधून रोनक भुतडा, कृष्णा श्रीरामे, सुबोध गव्हाळे, सत्यम स्वामी आदींनी निवडणूक जिंकली. तसेच शाळेचे असेम्ब्ली इन्चार्ज म्हणून ओमकार भालके, माधुरी उडतेवार,स्पोर्ट हेड वैष्णवी सुर्यवंशी,शिवम स्वामी, कल्चरल हेड रुद्र ठाकूर, अपेक्षा बिरादार, डिसिप्लिन इंचार्ज श्र्वेता पांचाळ व प्रथमेश मुसळे यांची निवड झाली.याप्रसंगी मान्यवरांची मनोगते झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक हेड गर्ल जान्हवी शेटे हिने केले आभार शाळेचे प्राचार्य संतोष पाटील यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हर्षदा देशमुख, श्र्वेता शिंदे व सचिन जगताप यांनी केले. कार्यक्रमासाठी शाळेतील शिक्षक ,पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!