अहमदपूर शहरात घाणीचे साम्राज्य, अस्वच्छ पाणीपुरवठा, पथदिवे बंद ठाकरे सेना आंदोलन करणार

0
अहमदपूर शहरात घाणीचे साम्राज्य, अस्वच्छ पाणीपुरवठा, पथदिवे बंद ठाकरे सेना आंदोलन करणार

अहमदपूर शहरात घाणीचे साम्राज्य, अस्वच्छ पाणीपुरवठा, पथदिवे बंद ठाकरे सेना आंदोलन करणार

अहमदपुर (गोविंद काळे) : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने उपशहर प्रमुख शिवकुमार बेद्रे यांनी शहरातील अस्वच्छ पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, घाणीचे साम्राज्य,पथ दिवे बंद याची तक्रार जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन वरील तक्रारीची दखल घेण्याची मागणी केली आहे.
अहमदपूर शहरात अस्वच्छ पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांच्या ढिसाळ कारभारामुळे घाणीचे साम्राज्य वाढले असून शहरात जागोजागी कचऱ्याचे ढीग लागल्याचे दिसून येत आहेत. सगळीकडे कचराच कचरा आढळून येत आहे व शहरवासीयांना ना स्वच्छ पिण्या योग्य पाणी ना शहरातील स्वच्छता या अत्यावश्यक मूलभूत प्रश्नातून मुक्त करावे अशी विनंती केली आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे कळविण्यात आले आहे की अहमदपूर नगर परिषदेला वेळोवेळी निवेदने देऊन पाठपुरावा करूनही शहराची स्वच्छता केली जात नाही मी शहरवासी यांच्या वतीने नगरपरिषदेला रीतसर तक्रार करूनहीशहरात स्वच्छताबाबत कुठलीही दखल घेतली जात नाही नगरपरिषद अधिकारी कर्मचारी उडवा उडवीची उत्तर देतात व म्हणतात की गेली सात ते आठ महिन्यापासून स्वच्छता कामगार यांना पगार न मिळाल्यामुळे कामगार कामावर येत नाहीत असे सांगत आहेत प्रशासनाच्या ढिसाळ मनमानी कारभारामुळे शहराला अस्वच्छ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत आहे आणि शहरातील व मुख्य रस्त्यावरील नाली उपसा केलेल्या नालीतील घाण रोडवरती वाहून येत आहे घाणीमुळे शहरातील नागरिकांना डेंगू सदृश्य आजाराला सामोरे जावे लागत आहे तरी देखील आपल्या प्रशासनातील काम चुकार कर्मचाऱ्यांना जाग येत नाही ही शोकांतिका आहे यापूर्वी कार्यालयात असलेले मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे असताना शहराला चार दिवसाला स्वच्छ पाणी मिळतच होते पण शहरातील स्वच्छतेकडे देखील जातीने लक्ष देऊन वेळे प्रसंगी दंडात्मक कारवाई करून शहर स्वच्छ व सुंदर करण्याचे कार्य केले त्यांच्या कार्यकाळात झालेल्या कामांचा अहमदपुर वासियांना सार्थ अभिमान आहे.
तसेच शहरातील नागरीका कडून घरपट्टी नळपट्टी मालमत्ता कर सामान्य कर मोठ्या प्रमाणात वसूल करूनही अहमदपूर शहरात स्वच्छता होत नाही नगरपरिषद स्वच्छता विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे जनतेमध्ये प्रचंड नाराजी आहे शहराला नेहमीच स्वच्छ फिल्टरयुक्त पाणी मिळणे बाबतची सखोल चौकशी करून संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई करून शहराला फिल्टरयुक्त पाणीपुरवठा करावा व शहरातील नाल्याची नियमित साफसफाई करून सदरील घाण तात्काळ उचलून घेण्यात यावी व शहरातील बंद असलेले पथदिवे चालू करण्यात यावेत तसेच अहमदपूर शहराला सध्या प्रभारी मुख्याधिकारी आहेत ते मुख्याधिकारी उदगीर व अहमदपूर या दोन्ही नगरपरिषद चा कारभार पाहत असल्यामुळे तात्काळ कामे होत नाहीत त्यामुळे अहमदपूर शहराला एक कर्तव्यदक्ष मुख्याधिकाऱ्याची निवड करण्यात यावी.
या निवेदनाचे दखल घेऊन शहरवासी यांच्या व्यथा जाणून घेऊन आपल्या कार्यालयातील कामचुकार कर्मचाऱ्यांना तंबी देऊन शहराला नियमित फिल्टर युक्त स्वच्छ पाणीपुरवठा व शहरातील स्वच्छतेकडे आपण जातीने लक्ष घालून शहरवासीयांना न्याय द्यावा अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख अजित उर्फ बालाजी रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांच्या न्याय हक्कासाठी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल याची गांभीर्याने दखल घ्यावी. या निवेदनावर शिवसेना उपजिल्हाप्रमुख भारत सांगवीकर, शहरप्रमुख शिवा कासले, उप तालुका प्रमुख अनिकेत फुलारी, गणेश माने, तिरुपती पाटील, उप शहरप्रमुख शिवा भारती यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!