आर्य वैश्य महासभा महिला मंडळ अहमदपूर यांच्या तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व श्रावण सोहळा
आर्य वैश्य महासभा महिला मंडळ अहमदपूर यांच्या तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व श्रावण सोहळा
अहमदपूर (गोविंद काळे) : हसरा, नाजरा, जरासा, लाजरा, सुंदर साजीरा श्रावण आला असे म्हणत अहमदपूर शहरातील महिला महासभेच्या वतीने सौ. प्रतिक्षा वैभव झरकर यांच्या अध्यक्षेतेखाली संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरूवात अनुश्री गजानन डुब्बेवार व खुशी गजानन डुब्बेवार यांनी गणेश वंदनाने केली श्रावण सोहळा हा कार्यक्रम सानवी मंगल कार्यालय अहमदपूर येथे दि ११/८/२०२४ रोजी पार पडला या सोहळ्याचे प्रायोजक गुंडाळे फॅमीली शॉप, हिदुस्थान लिव्हर, शशिकला ट्रेडर्स, साक्षी मोबाईल, आकाश किराणा यांचे सहकार्य लाभले
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून लातुर जिल्हयाच्या माजी अध्यक्षा सौ. अंजलीताई कोटलवार व नवनिर्वाचित लातुर जिल्हयाच्या महिला महासभेच्या अध्यक्षा सौ. मिरा देवशटवार व त्यांची टिम सरोजा चिंतलवार, मर्जुषा पारसेवार, हर्षदा देवशटवार, शितल मद्रेवार यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली तसेच व्यासपीठावर सौ. विद्या गुंडाळे, सौ. जयश्री सत्यप्रेम झरकर अंबेजोगाई उपस्थीत होते यानिमीत्याने महिला महासभेच्या वतीने आर्य वैश्य (कोमटी) समाजातील ४० गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान चिन्ह व शाल देवून सत्कार करण्यात आला.
सण संस्कृतीचा धमाल मस्ती, बेस्ट सासु सुन जोडी स्पर्धा घेण्यात आली त्यात ३ फेऱ्या ठेवण्यात आल्या १) मॅचींग २) रॅम्प वॉक ३) खेळ यातुन बेस्ट सासु सुन जोडी निवडण्यात आली प्रथम विजेता १) सौ सुचिता आरविंद कमठाने व रोहीणी शुभम कमठाने यांना सुंदर अशी ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला. व्दितीय विजेत्या २) श्रीदेवी सुधाकर देबडवार व सौ. शिवणी कृष्णा देबडवार यांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आरतीताई गादेवार यांनी सर्व आलेल्या पाहुण्याचा भेट वस्तु देवून सत्कार केला कार्यक्रमाची प्रस्तावना सविता चिद्रेवार यांनी केली.
अंजली ताई कोटलवार, मिरा देवशटवार, हर्षदा देवशटवार यांच्या मार्गदर्शनाचे चार शब्द ऐकण्यास लाभले तसेच अहमदपूर महिला महासभेच्या संपूर्ण कार्यकारणी मंडळ प्रतिनिधी वैशाली कोसलगे, रत्नमाला कोटगीरे, सुमेद्या कोटगीरे, शिल्पा गादेवार, अनिता कोटगीरे, स्वाती डुब्बेवार, आरती कोटगीरे, आश्विनी गादेवार, शोभा गादेवार, स्वाती गादेवार, धनश्री कोटलवार, स्वरा गादेवार, रेणुका डुब्बेवार, या कार्यक्रमाच्या प्रोजेक्ट हेड होत्या. तसेच सर्व महासभा मेंबरसला पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमासाठी सर्व महिला कार्यकारणी मंडळ व पदाधिकारी व सर्व महासभेच्या महिला मेंबर यांनी खुप परिश्रम घेतले या कार्यक्रमाला समाजातील मोठया संख्येने महिला भगीनी यांच्या उपस्थीतीत हा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
