श्री अनंतपाळ वाचनालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
श्री अनंतपाळ वाचनालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
शिरूर अनंतपाळ : शहरातील श्री अनंतपाळ नवयुवक( तालुका – अ वर्ग )वाचनालयात 78 वा.स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. वाचनालयाचे सदस्य श्री विरभद्र भातांब्रे गुरुजी यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.तर वाचनालयाचे चिटणीस डॉ. राजकुमार बोपलकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी सुरेश कोटलवार, सत्यनारायण बंग, सौ. उज्वला दुरुगकर, सौ. लता शेरसांडे, शोभाताई बेंजरगे, सौ.रंजना बोपलकर,पंडितराव शिंदाळकर, त्र्यंबकप्पा आवळे, बालाजी देवसटवार, मनोज दुरुगकर, शरद दुरुगकर, भरत दुरुगकर, शंकरराव बेंबळगे, अप्पाराव नाटकरे,उजेडे सर, इंदलकर सर,वैजनाथ संभाळे, नागनाथ भातांब्रे,संस्कार मोती सेमी इंग्लिश स्कुलचे संचालक शाम व्यजने,आशिष स्वामी, शिक्षक उत्सुर्गे मॅडम, शिंदाळकर मॅडम, चामले मॅडम, म्हेकरे मॅडम राम संभाळे,ग्रंथपाल ग्रंथमित्र काशिनाथ बोडके, सहायक ग्रंथपाल शिवनंदा चौसस्टे, अनंत सूर्यवंशी आदीसह संस्कार मोती सेमी इंग्लिश स्कुलचे विद्यार्थी उपस्थित होते.
