ॲड.मल्लिकार्जुन करडखेलकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश.
उदगीर (एल.पी.उगीले). महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान असलेल्या शिवनेरी किल्ल्याच्या पहिल्या पायरीचे दर्शन घेऊन महाराष्ट्रात रयतेचे राज्य आणण्याचा निर्धार करत शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा सुरू झाली आहे. शिवस्वराज्य यात्रा उदगीर मतदार संघात आगमन झाले.या शिवस्वराज्य यात्रेत मौजे करडखेल ता.उदगीर येथील ॲड.मल्लिकार्जुन करडखेलकर हे सेवानिवृत्त उप मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद परभणी हे मागील २ वर्षापासून वकीली करत आहेत.
ॲड.मल्लिकार्जुन करडखेलकर हे सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम करण्याची आवड असल्यामुळे सर्व जाती धर्मातील जनतेशी चांगले संबंध असल्यामुळे उदगीर विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्रजी पवार) या पक्षात मनापासुन काम करण्याची आवड असल्याने तसेच शरदचंद्र पवार यांच्या विचाराची प्रेरणा घेऊन मतदार संघातील तळागाळातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याच्या निर्धार करूनच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा सौ.सुप्रियाताई सुळे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, खा.अमोल कोल्हे ,प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील नागराळकर, प्रा.शिवाजीराव मुळे,जिल्हाध्यक्ष संजय शेटे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे. तसेच शरदचंद्र पवार यांनी उदगीर मतदार संघात लढण्याची संधी दिल्यास संधीचे सोने करून उदगीर मतदार संघात शरदचंद्र पवार यांच्या विचाराचा नवीन चेहरा निवडून येणार असल्याची चर्चा जनतेतून होत आहे.
