रामगिरी महाराज यांना अटक करा, या मागणीसाठी वाढवणा पाटी येथे दोन तास रास्ता रोको

0
रामगिरी महाराज यांना अटक करा, या मागणीसाठी वाढवणा पाटी येथे दोन तास रास्ता रोको

उदगीर (एल.पी.उगीले) इस्लाम धर्मियांचे प्रेषित पैगंबर हजरत मोहम्मद सल्ललाहू अलैहिव सल्लम यांच्या बद्दल चुकीचे, आक्षेपार्ह वक्तव्य करून मुस्लिम समाजाच्या भावनेस ठेस पोहोचवल्या मुळे वाढवणा व वाढवणा परिसरातील मुस्लिम बांधवांच्या वतीने तालुक्यातील वाढवणा पाटी येथे 2 तास रस्ता रोको आंदोलन केले, व रामगिरी महाराज यांना अटक करण्याची मागणी केली.
चुकीचे वक्तव्य करून मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या प्रकरणी रामगिरी महाराज यांच्यावर कायदेशीर गंभीर स्वरूपाचा गुन्हा नोंद करून, त्याला अटक करावी, त्याच्या भाषणावर कायमस्वरूपी बंदी घालावी, व यांच्यावर हद्दपारची कार्यवाही करण्यात यावी.
या मुख्य मागण्याचे निवेदन मुस्लिम बांधवांच्या वतीने यावेळी वाढवणा पोलीस स्टेशन च्या प्रभारी अधिकाऱ्यास देण्यात आले.
यावेळी हजारो मुस्लिम बांधवांनी शांततेच्या मार्गाने रस्ता रोको आंदोलन केले, आठ दिवसाच्या आत दिलेल्या निवेदनाप्रमाणे रामगिरी महाराजांवर कार्यवाही नाही झाल्यास, परत मोठ्या स्वरूपात रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!