राजकुमार गायकवाड यांचा मनसेत प्रवेश.
उदगीर (एल.पी.उगीले):- राजकुमार गायकवाड यांनी मनसे मध्ये प्रवेश करत उदगीर विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे. ते उदगीर तालुक्यातील गंगापुर चे रहीवासी असुन सध्या ते पुणे येथे उद्योजक आहेत. त्यांनी सध्याच्या खिचडी राजकारणास कंटाळुन राज ठाकरे यांच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. कोणत्या ही परिणामांची चिंता न करता सत्य भुमिका मांडण्याची सवयीने प्रेरीत होवुन तसेच राज ठाकरे हेच महाराष्ट्राचे नवनिर्माण करु शकतात, तेच जनसामान्यांना न्याय देवु शकतात हा विश्वास वाटल्याने त्यांनी गंगापुर येथील त्यांच्या सहकाऱ्यासह जिल्हाध्यक्ष संजय राठोड यांच्या हस्ते मनसे मध्ये प्रवेश केला. त्यांच्या मनसेत येण्याने उदगीर मनसेचे पक्ष संघटन अजुन मजबुत झाले आहे. त्याची आगामी निवडणुकीत मोठी मदत होईल. तसेच पक्षात योग्य तो सन्मान केला जाईल,असे मत संजय राठोड यांनी व्यक्त केले. हा प्रवेश उदगीर तालुकाध्यक्ष संग्राम रोडगे यांनी घडवुन आणला. याप्रसंगी राजकुमार गायकवाड व त्यांच्या सहकार्याचे स्वागत करण्यात आले, व त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. त्यांचा सोबत हिरामन गायकवाड, भागवत गायकवाड,सचिन सुर्यवंशी, रविंद्र गायकवाड ,सुरेश गायकवाड व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रवेश केला.
