नात्यांचे पावित्र्य जपल्यास संस्कृती टिकून राहील- डॉ. रामकृष्ण बदने

0
नात्यांचे पावित्र्य जपल्यास संस्कृती टिकून राहील- डॉ. रामकृष्ण बदने

उदगीर (एल.पी.उगीले) महात्मा बसवेश्वरांनी बाराव्या शतकात रक्ताच्या नात्यापेक्षाही मानवतेच्या
नात्याला अधिक महत्त्व दिले होते. त्यामुळे विविध जाती धर्मातील लोक बसवेश्वरांच्या विचाराशी एकरूप झाले. पैसा,प्रसिद्धी, मान-सन्मान यामुळे आज नात्यांमध्ये दुरावा निर्माण होत आहे. पाश्चिमात्य देशापेक्षा आपली संस्कृती मानवतेच्या दृष्टिकोनातून अतिशय समृद्ध आहे. ही संस्कृती कायम टिकून ठेवायचे असेल, तर नाते जपणे गरजेचे असल्याचे डॉ. रामकृष्ण बदणे यांनी सांगितले.
वीरशैव समाज उदगीरच्या वतीने धर्मवीर संग्रामप्पा शेटकार यांचा ८५ वा. स्मृतिदिनानिमित्त आयोजित ९० वा वचन सप्ताहातील चौथे पुष्प प्रा. रामकृष्ण बदने यांनी भारतीय संस्कृतीतील नात्यांचे पावित्र्य या विषयावर गुंफले. कार्यक्रमाच्या
अध्यक्षस्थानी श्रीमती लक्ष्मीबाई पांढरे होत्या. यावेळी विचारपीठावर वीरशैव समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत वैजापुरे, उमाकांत वडजे उपस्थित होते.
प्रारंभी महात्मा बसवेश्वर व धर्मवीर संग्रामप्पा शेटकार यांच्या प्रतिमेचे पुजन व दिपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी पुढे बोलताना रामकृष्ण
बदने यांनी, फक्त चांगले विचार असुन चालत नाही तर आचरणही शुध्द असले पाहिजे. महात्मा बसवेश्वरांचे विचारा सोबतच आचरण शुध्द होते, असे सांगून अनेक महात्म्यांचा दृष्टांत देऊन उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. अध्यक्षीय समारोपात लक्ष्मीबाई पांढरे यांनी, वचन साहित्यांचे केवळ पारायण करून
चालणार नाही तर त्यानुसार कृती करणे गरजेचे आहे. महात्मा बसवेश्वरांचे वचनसाहित्य हे क्रांतिकारी स्वरूपाचे असून, समतेची शिकवण देणारे तत्व वचनसाहित्यात असल्याचे सांगितले. प्रास्ताविक व सुत्रसंचालन अॅड. महेश
मळगे यांनी केले. आभार डॉ. म.ई. तंगावार यांनी मानले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!