नेत्र व दंत रोग तपासणी शिबिर संपन्न
अहमदपूर( गोविंद काळे) यशवंत विद्यालय,अहमदपूर येथे प्रतिवर्षाप्रमाणे प्रथम सत्रातील आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले.यात नेत्र व दंतरोग चिकित्सा शिबिर संपन्न झाले.
विद्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात डॉक्टर रामेश्वर चामले नेत्र रोग तज्ञ तसेच डॉक्टर चैतन्य नलवाड चामले दंत रोग तज्ञ या वैद्यकीय तज्ञांनी १५० विद्यार्थ्यांची तपासणी केली.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना नेत्र तज्ञ रामेश्वर चामले, यांनी सांगितले की “आपल्या डोळ्याची निगा राखण्यासाठी मोबाईलचा कमी वापर करावा, सकस आहार घ्यावा, सकाळी उठल्यानंतर थंड पाणी मारून डोळे स्वच्छ करून घ्यावेत, रात्री पुरेशी झोप घ्यावी हे करूनही जर डोळ्याचे कोणते आजार झाले तर आपल्या डॉक्टरांकडे तपासणी करून घ्यावी.
डोळ्याची काळजी घेणे गरजेचे आहे. डोळे निरोगी राहिले तर आपण जग पाहू असे नमूद केले.”
दंत चिकित्सा तज्ञ डॉक्टर चैतन्य नलवाड मॅडम यांनी सांगितले की “दाताची काळजी घेण्यासाठी सकाळी आणि संध्याकाळी दोन वेळेस ब्रश करणे गरजेचे आहे .विद्यार्थ्यांनी सकस आहार घ्यावा,थंड आणि गरम पदार्थ एकसाथ खाऊ नयेत ,हिरड्या तून रक्त येत असेल तर आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधावा.”
या शिबिरात विद्यालयातील जवळपास दीडशे विद्यार्थ्यांनी आपल्या डोळे आणि दातांचे तपासणी करून घेतली त्यांना योग्य तो सल्ला व मार्गदर्शन करण्यात आले.
आरोग्य शिबीराच्या उद्घाटन प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक गजानन शिंदे, उपमुख्याध्यापक माधव वाघमारे पर्यवेक्षक शिवाजी सूर्यवंशी, दापके सर साई आय केअर सेंटर ,सांस्कृतिक प्रमुख आर.व्ही.पाटील ,कलाध्यापक महादेव खळुरे हे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्तविक डॉ.शरद करकनाळे तर आभार कपिल बिरादार यांनी मानले.
वरील उपक्रमाबद्दल संस्थेचे सचिव डी.बी.लोहारे गुरुजी,अध्यक्ष डाँ अशोकराव सांगविकर,उपाध्यक्ष डाँ भालचंद्र पैके,उपसचिव डाँ सुनिताताई चवळे,आदिनी कौतुक केले.
