निवासी अपंग विद्यालयात दिव्यांग विद्यार्थ्यांसोबत रक्षाबंधन साजरे करून क्रीडा साहित्य देण्यात आले
अहमदपूर ( गोविंद काळे ) येथील इनरव्हील क्लब च्या वतीने निवासी अपंग विद्यालयात दिव्यांग विद्यार्थ्यांसोबत रक्षाबंधन उत्साहात साजरे करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इनर व्हील क्लबच्या अध्यक्षा विजया भूसारे होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. संजीवनी हेरकर,डॉ. मीनाक्षी करकनाळे, वैशाली चामे, कलावती भातांब्रे, शिवालिका हाके सह मान्यवरांची उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रेमा वतनी यांनी वृक्षारोपण गीत सहअभिनय सादर केले. दिव्यांग विद्यार्थ्यांना इनरव्हील क्लबच्या वतीने कॅरम,चेस,लुडो, सापशिडी,हाॅकी, बॅडमिंटन सह वैचारिक व मनोरंजनात्मक क्रीडा साहित्य भेट देऊन खाऊ वाटप करण्यात आला.
यावेळी कलावती भातांब्रे, डॉ.संजीवनी हेरकर, डॉ.मिनाक्षी करकनाळे, वैशाली चामे, शिवालिका हाके यांची मनोगत पर भाषणे झाली. अध्यक्षीय समारोप प्रसंगी विजया भूसारे म्हणाल्या की,दिव्यांग विद्यार्थ्यांनी मनाने कणखर बनून आपल्या अपंगत्वावर मात करून जीवनात यशस्वी व्हावं
यावेळी माजी अध्यक्षा प्रेमा वतनी, मुख्याध्यापक आशा रोडगे,सुनीता गुणाले, मेघना रेड्डी,प्रतिभा निला,स्नेहा पोकर्णा, कांचन काडवादे,पूजा गुणाले,बालिका चोरमले, अश्विनी शिनगारे सह सदस्या उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक परमेश्वर पाटील यांनी केले सूत्रसंचालन बालाजी फुलमंटे यांनी केले तर आभार आशा रोडगे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
