किलबिल च्या जान्हवी जाधव हीची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड….

0
किलबिल च्या जान्हवी जाधव हीची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड….

अहमदपूर ( गोविंद काळे )
नुकतीच 16 ऑगस्ट ते 18 ऑगस्ट दरम्यान मुंबई येथे पार पडलेल्या 17 वर्षीय कॅडेट राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेत किलबिल नॅशनल स्कूल शाळेची खेळाडू जान्हवी जाधव हिने इप्पी सांघिक प्रकारात सुवर्णपदक पटकावले.
तर सेबर प्रकारातही सुवर्णपदक पटकावले. या खेळाडूंना शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त सन्माननीय दत्ता भाऊ गलाले सर यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले. या राज्यस्तरीय स्पर्धेत घवघवीत यश संपादन करीत तिची पुढे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे त्याबद्दल जान्हवी व तिचे वडील गणपतराव जाधव यांचा शाळेच्या वतीने सन्मान करण्यात आला त्यापसंगी संस्थेचे सचिव ज्ञानोबा भोसले, प्राचार्य संतोष पाटील, कार्यालयीन अधीक्षक सचिन जगताप, धर्मेंद्र शिराळे यांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!