महात्मा फुले महाविद्यालयात सद्भावना दिन साजरा
अहमदपूर ( गोविंद काळे)
माहिती व तंत्रज्ञान युगाचे निर्माते, भारताचे माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांची जयंती येथील महात्मा फुले महाविद्यालयात ‘सद्भावना दिन’ म्हणून साजरी करण्यात आली.
राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने घेण्यात आलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्रातील ज्येष्ठ लेखक, समीक्षक, विचारवंत तथा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील हे होते. तर यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी हे उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ . बब्रुवान मोरे यांनी विद्यार्थ्यांना व उपस्थित सर्वांना सद्भावनेची शपथ दिली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. पांडुरंग चिलगर यांनी केले तर आभार प्रदर्शन राष्ट्रीय सेवा योजनेचे सह कार्यक्रमाधिकारी डॉ. सतीश ससाणे यांनी केले. यावेळी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी, प्राध्यापक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
