यशवंत विद्यालयात राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थिंनीने केले वृक्षारोपण
अहमदपूर ( गोविंद काळे )
महाराष्ट्र शासनाने २०१६ पासून वृक्ष लागवड योजना आणली.प्रत्येक शाळेत वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन व्हावेत.तसेच शालेय स्तरावर मुलांना चांगले संस्कार व्हावेत.वृक्षारोपणाचे महत्त्व पटवून द्यावेत.हा उदात्तहेतूने विद्यालयात राष्ट्रीय छात्र सेनेच्या मुलींनी डॉ.नेहा पाटील,डॉ.प्रतिमा येलगटे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज यशवंत विद्यालयात वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी शाळेच्या मुख्याध्यापक गजानन शिंदे यांनी वृक्षांचे महत्त्व सांगितले की,वृक्ष आपल्याला ऑक्सिजन देतात, हवा शुद्ध करतात आणि पाऊस आणतात. ते आपल्याला छाया देतात आणि उन्हापासून वाचवतात. ते आपल्याला फळे आणि फुले देतात. वृक्ष आपल्याला पर्यावरण संरक्षणामध्ये मदत करतात.म्हणून प्रत्येक विद्यार्थ्यांनी एक वृक्ष लावले पाहिजेत असे मत मांडले.
वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचरे या संत वचनाप्रमाणे वृक्षांचे महत्त्व आमच्या जीवनात अनन्यसाधारण आहे. निसर्ग आपले आरोग्य जपतो. मग साहजिकच निसर्गाची जपणूक ही आपली जबाबदारी आहे, असा संदेश वृक्षारोपणाच्या या सामाजिक कार्यक्रमातून देण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी
एन.सी.सी.ऑफिसर
मधुबाला आंधळे,एन.सी.सी.ऑफिसर
गौरव चवंडा,सांस्कृतिक प्रमुख राजकुमार पाटील,शरद करकनाळे,कलाध्यापक महादेव खळुरे,आदिनी परिश्रम घेतले.
वरील उपक्रमाबद्दल संस्थेचे सचिव डी.बी.लोहारे गुरुजी,अध्यक्ष डाँ अशोकराव सांगविकर,उपाध्यक्ष डाँ भालचंद्र पैके,उपसचिव डाँ सुनिताताई चवळे, मुख्याध्यापक गजानन शिंदे,उप मुख्य.माधव वाघमारे पर्यवेक्षक रामलिंग तत्तापुरे,शिवाजी सूर्यवंशी आदिनी कौतुक केले.
