विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या माध्यमातून संरक्षण भिंतीच्या कामाचा शुभारंभ
अहमदपुर ( गोविंद काळे ) तालुक्यातील तांबटसांगवी, लांजी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या माध्यमातून मागील दहा वर्षात मिळकती मधून जमा झालेल्या १० लक्ष रुपये रकमेतून विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या गोडाऊन परिसराची जागा नियमानुसार आरक्षित करून त्या जागेच्या संरक्षण भिंतीच्या बांधकामासाठी वरील रक्कम खर्च करण्याचे नियोजन चेअरमन हरिभाऊ कदम यांनी संचालका समोर मांडले, मांडलेल्या भूमिकेला सर्व संचालक मंडळाने पाठिंबा दिला. विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या माध्यमातून मिळालेल्या रकमेचा व्यर्थ खर्च किंवा दौरे दाखवून खर्च न करता मागील काल खंडातील ३ लक्ष रुपये कर्ज परतफेड करुन जमा झालेली १० लक्ष रुपये रक्कम कायमस्वरूपी उपयोगात यावी, अशाच योजनेसाठी वापर व्हावा यावर चर्चा झाली. मागील पंचवीस ते तीस वर्षापासून गोडाऊन परिसरात अतिक्रमण केले होते सर्व अतिक्रमण काढून या जागेवर आज संरक्षण भिंतीच्या कामाची सुरुवात करण्यात आली. सहकार क्षेत्रात कसं काम करावं हे चेअरमन हरिभाऊ कदम यांनी दाखवून दिले आहे. त्यांच्या हस्ते नारळ वाढवून या कामाचा शुभारंभ आज करण्यात आला.
यावेळी व्हाईस चेअरमन सदानंद मुंडे,संचालक पांडुरंग नरवटे, शिवसेनेचे उप तालुका प्रमुख तथा संचालक अनिकेत फुलारी, अब्बास पटेल,ग्रामपंचायत सदस्य अनिल हिरवे, कांतराव नरवटे, शंकर नरवटे, ऋषिकेश कदम, दत्ता कदम,श्रिराम नरवटे,गणेश राजपंगे,बंडु कदम, मंगेश सगर, शिवाजी नरवटे,दौलत कांबळे, दयानंद सगर, विशाल हिरवे, शंकर आगलावे,नितीन कांबळे, गणेश पानगट्टे, गणेश कच्छवे, अमोल हिरवे, अनंत कांबळे यांच्यासह नागरीकांची उपस्थिती होती.
