महिला डॉक्टर हत्येच्या निषेधार्थ इनरव्हील क्लब च्या वतीने कॅन्डल मार्च
अहमदपूर ( गोविंद काळे )
देशात सध्या सर्वत्र चर्चेचा विषय असलेल्या कलकत्ता येथील नॅशनल वैद्यकीय महाविद्यालयात पी जी चे शिक्षण घेणाऱ्या प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टर 36 तासाच्या ड्युटीवर असताना नराधमाने सामुदायिक बलात्कार करून तिची निघृणपणे हत्या केल्याच्या निषेधार्थ इनर व्हील क्लब अहमदपूरच्या वतीने कॅन्डल मार्च काढण्यात आला.
या कॅन्डल मार्च ची सुरुवात सृष्टी हॉस्पिटल, सरस्वती कॉलनी येथून करून शहराच्या प्रमुख मार्गावरून मार्गस्थ होऊन शिवाजी चौकामध्ये समारोप करण्यात आला.
या कॅन्डल मोर्चाचे नेतृत्व भाजपा महिला आघाडी मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेशाच्या सरचिटणीस प्राचार्य रेखाताई हाके यांनी केले.
या कॅन्डल मार्च मध्ये इनर व्हील क्लबच्या अध्यक्षा विजया भूसारे, डॉ.अंजली उगीले, डॉ. मीनाक्षी करकनाळे, एडवोकेट सुवर्णा महाजन, डॉ. वर्षा भोसले, प्राचार्या शोभाताई टोम्पे ,कलावती भातांब्रे,प्रेमा वतनी, डॉ. सुचिता कापसे, डॉ. पल्लवी कदम, डॉ. चलवदे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
शिवाजी चौकामध्ये झालेल्या निषेध सभेत भाजपा महिला आघाडीच्या सरचिटणीस रेखा हाके म्हणाल्या की. मेनबत्ती जाळण्यापेक्षा नराधमाला जाळलं पाहिजे. डॉ. अंजली उगिले, डॉ. मीनाक्षी करकनाळे,शोभा टोम्पे,प्रेमा वतनी, एडवोकेट सुवर्णा महाजन,मुख्याध्यापक आशा रोडगे, डॉक्टर ओम प्रकाश किनगावकर यांची मनोगत पर भाषणे झाली.
सदरची केस जलद गती न्यायालयामध्ये दाखल करून नराधमांना फाशीची शिक्षा द्या, देशातील सर्व महिलांना सुरक्षितता द्या, नराधमांना फाशी दिलीच पाहिजे या घोषणाने संपूर्ण शहर दुमदुमून गेले होते. पीडित डॉक्टर मुलीच्या आत्म्याला शांती लाभावी म्हणून दोन मिनिटाचे मौन पाळून भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.
या कॅण्डल मार्च मध्ये शितल मालू,मुख्याध्यापक दर्शना हेंगणे, मुख्याध्यापक मीना तोवर, सुनिता गुणाले, एडवोकेट ज्योती काळे, आरती गादेवार,ज्योती जाधव, पूजा गुणाले, शिवालिका हाके, स्नेहा पोकर्णा सह इनरव्हील क्लबच्या सर्व सदस्या, डॉक्टर, वकील, उद्योजिका, प्राध्यापक, शिक्षक, परिचारिका आणि नवजीवन स्कूल ऑफ नर्सिंग च्या व महाविद्यालयाच्या यु्वती यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. कॅन्डल मार्च यशस्वी करण्यासाठी इनर व्हील क्लबच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.