यशवंत विद्यालयात स्वातंत्र्य दिनाचा ध्वजारोहण सोहळा उत्साहात साजरा
अहमदपूर ( गोविंद काळे )येथील यशवंत विद्यालयात 78 वा स्वातंत्र्य दिन विविध उपक्रम घेऊन व ध्वजारोहणाने उत्साहात साजरा करण्यात आला.
प्राचार्य गजानन शिंदे हस्ते ध्वजारोहण करण्यात आला. यावेळी स्वच्छतेची शपथ संस्थेचे सचिव डी बी लोहारे गुरुजी यांनी दिली .
यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर अशोक सांगवीकर, उपप्राचार्य प्रा मुजमिल सय्यद, उप मुख्याध्यापक एम बी वाघमारे, पर्यवेक्षक राम तत्तापुरे, शिवाजी सूर्यवंशी, कोटा पॅटर्नचे प्रमुख कयूम शेख ,शिवाजीराव गायकवाड यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या प्रारंभी राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध नेत्यांची, क्रांतिकारकांची वेशभूषा करून देशभक्तीपर गीत गायन करण्यात आले.
या समयी विविध स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते बक्षीस व सन्मानपत्र देऊन करण्यात आला. अध्यक्षीय समारोप डॉक्टर अशोक सांगवीकर यांच्या भाषणाने झाला.
सूत्रसंचालन के डी बिराजदार आणि आर व्ही पाटील यांनी आभार वाघमारे एम बी यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
