महात्मा फुले महाविद्यालयाची सोनाली गायकवाड जिल्हा क्रीडा पुरस्काराने सन्मानित
अहमदपूर , ( गोविंद काळे )
येथील महात्मा फुले महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. सोनाली गायकवाड ला तलवारबाजी क्रीडा प्रकारात केलेल्या विशेष कामगिरीबद्दल जिल्हास्तरीय महिला गुणवंत खेळाडू पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
याबाबतचे सविस्तर होत असे की, महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या कुशल नेतृत्वाखाली तसेच क्रीडा संचालक प्रो. डॉ. अभिजीत मोरे यांच्या मार्गदर्शनानुसार कु. सोनाली गायकवाड या विद्यार्थिनी ने तलवारबाजी क्रीडा प्रकारात केलेल्या विशेष कामगिरीबद्दल तिला जिल्हास्तरीय उत्कृष्ट गुणवंत महिला खेळाडू या पुरस्काराने भारतीय स्वातंत्र्याच्या ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त दि. १५ऑगस्ट२०२४ रोजी लातूर येथे जिल्हाधिकारी श्रीमती वर्षा घुगे – ठाकूर, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्याचे क्रीडा मंत्री नामदार संजय बनसोडे यांच्या हस्ते जिल्हास्तरीय क्रीडा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
जिल्हास्तरीय क्रीडा पुरस्कार मिळाल्या बद्दल महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी कु. सोनाली गायकवाड चा सत्कार करून पुढील क्रीडा क्षेत्रातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.यावेळी क्रीडा संचालक प्रो. डॉ. अभिजीत मोरे प्रो. डॉ. अनिल मुंडे, प्रो डॉ. नागराज मुळे, डॉ. प्रशांत बिरादार,डॉ. सचिन गर्जे आदींची उपस्थिती होती.
तसेच किसान शिक्षण प्रसारक मंडळ उदगीर चे अध्यक्ष श्रीरंगराव पाटील एकंबेकर, सचिव पी. टी. शिंदे यांच्यासह मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्यासह सर्व प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी व विद्यार्थ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
