ज्ञानदीप’ अकॅडमीत रक्षाबंधन सण उत्साहात साजरा

0
ज्ञानदीप' अकॅडमीत रक्षाबंधन सण उत्साहात साजरा

ज्ञानदीप' अकॅडमीत रक्षाबंधन सण उत्साहात साजराज्ञानदीप' अकॅडमीत रक्षाबंधन सण उत्साहात साजरा

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील ज्ञानदीप अकॅडमी मध्ये बहीण भावाच्या अतूट नात्याचा सण रक्षाबंधन उत्साहात साजरा आला. करण्यात

यावेळी ज्ञानदीप अकॅडमी चे संचालक उद्धवराव इप्पर यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, आपला भारत देश हा धार्मिक संस्कृतीचा देश असून आपण अनेक सण मोठ्या उत्साहात पार पाडत असतो. असाच एक सण म्हणजे रक्षाबंधन हा सण. ना- रळी पौर्णिमा या दिवशी साजरा करण्यात येतो रक्षाबंधन म्हणजे बहिण भावाच्या प्रेमाचे अतूट बंधन. हा सण बहीण भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस मानला जातो. या दिवशी बहिण भावाच्या हातावर राखी बांधून भावाचे हृदय प्रेमाने जिंकून घेते. राखी म्हणजे बहिणीच्या रक्षणाचे वचन समजण्यात येते. राखी हा नुसता धागा नसून ते बहीण भावाच्या नात्याचे बंधन असते.रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधून तिच्या रक्षणाचे , तसेच अडी अडचणीच्या प्रसंगी बहिणीच्या सोबत खंबीरपणे उभे राहण्याचे वचन घेत असते. बहीण भाऊ एकमेकांपासून कितीही लांब असले तरी या पवित्र सणाला बहीण राखी बांधायला आपल्या भाऊरायाकडे जातेच किंवा भाऊ स्वतः भाऊ हा स्वतः जाऊन आपल्या बहिणीच्या हातून राखी बांधून घेत असतो. असेही मत व्यक्त केले. यावेळी शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!