महात्मा फुले महाविद्यालयात रोटरी क्लबच्या वतीने औषधी वनस्पतींचे वृक्षारोपण

0
महात्मा फुले महाविद्यालयात रोटरी क्लबच्या वतीने औषधी वनस्पतींचे वृक्षारोपण

महात्मा फुले महाविद्यालयात रोटरी क्लबच्या वतीने औषधी वनस्पतींचे वृक्षारोपण

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील महात्मा फुले महाविद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर औषधोद्यानात रोटरी क्लब अहमदपूर यांच्या सौजन्याने २०० औषधी वनस्पतीचे वृक्षारोपण करण्यात आले.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत रोटरी क्लब अहमदपूर यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर औषधोद्यानात विविध प्रकारच्या २०० औषधी वनस्पतीचे वृक्षारोपण प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व रोटरी क्लबचे अध्यक्ष रोटरीयन राजेंद्र कल्याणी, सचिव रो. अनिल फुलारी, रो. ॲड. भारत चामे,रो .प्रा. द.मा. माने ,रो . मोहिब कादरी, रो.प्रा. कपिल बिरादार, रो.अनिल चवळे आदींच्या हस्ते करण्यात आले.
या औषधी वनस्पती मध्ये बेहडा, रिटा , अडुळसा , तुळस, गवती चहा, लक्ष्मीतरु , निरगुडी, मेहंदी , कोरफड, बेल , मुरुडसिंगी , डिकमळ , शमी , गुगळ, सीता अशोक, तामलपत्र , दालचिनी, कापूर, रुद्राक्ष, आलपाईस , कालाकुंदा या औषधी वनस्पतीचा समावेश आहे.
यावेळी महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी रोटरी क्लब ने सहकार्य केल्याबद्दल रोटरी क्लबच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा सन्मान केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रो. डॉ. अनिल मुंढे यांनी केली तर आभार डॉ. पांडुरंग चिलगर यांनी मानले. यावेळी उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी, प्रो. डॉ अभिजीत मोरे पर्यावरण मित्र डॉ. डी. एन. माने, डॉ. सतीश ससाणे, ग्रंथपाल प्रा. परमेश्वर इंगळे डॉ. सचिन गर्जे, प्रशांत डोंगळीकर, अजय मुरमुरे चंद्रकांत धुमाळे वामन मलकापूरे शिवाजी चोपडे चंद्रकांत शिंपी आदींची उपस्थित होती.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!