अहमदपूर येथील ज्ञानदीप अकॅडमीचा दैनिक एकमतच्या वतीने सन्मान
अहमदपूर येथील ज्ञानदीप अकॅडमीचा दैनिक एकमतच्या वतीने सन्मान
अहमदपूर (गोविंद काळे) : महाराष्ट्रात अग्रेसर असणारे दै.एकमत वर्तमान पत्राचा वर्धापन दिन नुकताच लातूर येथील दगडोजीराव देशमुख सभागृहात पार पडला या वर्धापन दिन स्नेह मेळाव्यात अहमदपूर येथील ज्ञानदीप अकॅडमीने केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
शहरापासुन जवळच असलेली ज्ञानदीप ॲकॅडमी गेल्या 12 वर्षापासून सर्व सामान्य परिवारातील हजारो विद्यार्थी अकॅडीमत प्रवेश घेऊन शासकिय सेवेतील विविध पदावर कार्यरत आहे त्यामुळे शासकीय सेवेत अधिकारी घडवणारी अकॅडमी अशी उत्कृष्ट कार्याची ओळख निर्माण करणाऱ्या ज्ञानदीप अकॅडमीचा दै एकमतच्या वतीने लातुर येथील दगडोजीराव देशमुख सभाग्रहात मान्यवरांच्या हस्ते अकॅडमीचे संचालक उध्दव इप्पर व पत्नी दैवशाल इप्पर यांना पुस्कार देऊन सन्मान करण्यात आला
याप्रसंगी डॉ पूजा इप्पर, प्रशिक्षक राम मेजर, राहुल ढवळे, अंकुश अलापुरे, सतीश इप्पर, शिल्पा इप्पर (वन परिक्षेत्र अधिकारी), सुनील इप्पर आदींची उपस्थिती होती.
यावेळी रेणा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सर्जेराव मोरे,एकमतचे संपादक मंगेश देशपांडे डोंग्रजकार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती सुनील पडिले ट्वेंटी-वन शुगरचे व्हॉइस चेअरमन विजय देशमुख, लातूर जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रेय गिरी डी. एन .केंद्रे प्रभाकर सुडे तालमणी डॉ. राम बोरगावकर द्वारकादास श्याम कुमार चे तुकाराम पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
