महात्मा फुले महाविद्यालयाच्या पु. अहिल्यादेवी होळकर फुलोद्यानात वृक्षारोपण

0
महात्मा फुले महाविद्यालयाच्या पु. अहिल्यादेवी होळकर फुलोद्यानात वृक्षारोपण

महात्मा फुले महाविद्यालयाच्या पु. अहिल्यादेवी होळकर फुलोद्यानात वृक्षारोपण

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील महात्मा फुले महाविद्यालयात प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या नाविन्यपूर्ण संकल्पनेतून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुष्प वाटिकेत अहमदपूरच्या नूतन मामलेदार उज्ज्वला पांगरकर यांच्या हस्ते विविध फुलांच्या रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ, पर्यावरण प्रेमी प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली बालाघाटच्या पायथ्याशी असलेल्या महात्मा फुले महाविद्यालयात विविध महापुरुषांच्या नावे नंदनवन फुलविण्यात आले आहे.
त्याच अनुषंगाने नगरपरिषद अहमदपूरच्या सौजन्याने विकसित करण्यात आलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुष्प वाटिकेत मामलेदार उज्ज्वला पांगरकर यांच्या हस्ते व माजी नगरसेवक तथा सम्राट मित्र मंडळाचे अध्यक्ष डॉ. सिद्धार्थकुमार सूर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध फुलांच्या रोपांचे रोपण करण्यात आले. यामध्ये झेंडू, जिनिया, पारिजातक , बेलिया, सेफिया , सदाफुली, डीजे , गुलाब, कर्दळी, मोगरा, कनेरी , चाफा , सोनचाफा , जास्मिन , निशिगंधा , जाई , नंदिनी , शेवंती , स्वस्तिक , नागचाफा , कुंदा आदी विविध प्रकारच्या ५० पुष्परोपांचे रोपण करण्यात आले.
यावेळी प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी अहमदपूरच्या नूतन मामलेदार उज्ज्वला पांगरकर यांचा व डॉ. सिद्धार्थकुमार सूर्यवंशी तसेच आदर्श पालक प्रतिनिधी गणेश मामा पांचाळ यांचा यथोचित सत्कार करून सन्मान केला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन डॉ. पांडुरंग चिलगर यांनी केले तर आभार प्रो. डॉ. अनिल मुंढे यांनी मानले. यावेळी उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी , प्रो.डॉ. अभिजीत मोरे, डॉ. डी. एन. माने, एन. एस. एस.चे कार्यक्रमाधिकारी डॉ. बब्रुवान मोरे, सहाय्यक कार्यक्रमाधिकारी डॉ .सतीश ससाणे, प्रो. डॉ. नागराज मुळे, डॉ. सचिन गर्जे, ग्रंथपाल प्रा.परमेश्वर इंगळे , डॉ . सीमा उप्पलवार, प्रा.के . आर . कदम , प्रा. प्रतीक्षा मंडोळे , डॉ. संतोष पाटील , प्रशांत डोंगळीकर, अजय मुरमुरे,चंद्रकांत धुमाळे, वामन मलकापूरे, शिवाजी चोपडे,चंद्रकांत शिंपी यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक ,कार्यालयीन कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!