अहमदपूर तालुक्यातील ढगफुटी सदृश्य व अतिवृष्टीचे पंचनामे करून तात्काळ मदत करावी – माजी मंत्री विनायकराव पाटील

0
अहमदपूर तालुक्यातील ढगफुटी सदृश्य व अतिवृष्टीचे पंचनामे करून तात्काळ मदत करावी - माजी मंत्री विनायकराव पाटील

अहमदपूर तालुक्यातील ढगफुटी सदृश्य व अतिवृष्टीचे पंचनामे करून तात्काळ मदत करावी - माजी मंत्री विनायकराव पाटील

अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यात गेल्या काही दिवसांत झालेल्या ढगफुटी सदृश्य अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे व शेतजमीनीचे झालेले नुकसानीची स्थळपाहणी व पंचनामे करुन तात्काळ नुकसान भरपाई बरोबरच कापूस व सोयाबीन पिकांचे अनुदान शेतकऱ्यांना सरसकट देण्यात यावे अशी मागणी माजी राज्यमंत्री विनायकराव पाटील यांनी तहसिलदार यांच्या मार्फत जिल्हाधिकारी लातुर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे

मागील काही दिवसात अहमदपूर तालुक्यात झालेल्या ढगफुटी सदृश्य अतिवृष्टीमुळे शेतकरी बांधवांच्या पिकाचे व शेतजमीनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या हाता तोंडाला आलेला मेहनतीचा घास निसर्गाच्या अवकृपेमुळे हिरावून घेतल्याने तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाले असुन सामान्य नागरीकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे त्यामुळे तालुक्यातील पावसासामुळे नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांच्या पिकाची व शेतजमीनीची झालेल्या नुकसानीची स्थळ पाहणी व पंचनामे करुन नुकसानग्रस्त शेतक-याना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी त्याचप्रमाणे कापूस व सोयाबीन या पिकांचे देखील अनुदान शेतकऱ्यांना सरसकट देण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते माजी राज्यमंत्री विनायकराव पाटील यांनी तहसीलदार यांच्या मार्फत जिल्हाधिकारी लातुर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे

यावेळी माजी सभापती आर.डी दादा शेळके,सोमेश्वर कदम,रामभाऊ बेल्लाळे, निळकंठ पाटील होनराव, सुधीर गोरटे,कमलाकर शेकापुरे, राहुल शिवपुजे, जर्रानखॉन पठाण, विजयकुमार कदम, बालाजीराव बोबडे,अजित शेटकार,तुकाराम देवकते,श्रीकांत भुतडा,निळकंठराव हंबीर,मतिन सय्यद,समु शेख,गाझी सय्यद,अमोल पाटील,ज्ञानेश्वर शिंदे,सोहेल शेख,अर्जुन सुरनर आदीसह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अनेक नेते कार्यकर्ते उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!