सम्राट चंद्रगुप्त मौर्य इंटरनॅश्नल स्कूल च्या विद्यार्थ्यांचे तालुकास्तरीय योगासन स्पर्धेमध्ये घवघवीत यश
सम्राट चंद्रगुप्त मौर्य इंटरनॅश्नल स्कूल च्या विद्यार्थ्यांचे तालुकास्तरीय योगासन स्पर्धेमध्ये घवघवीत यश
अहमदपूर (गोविंद काळे) : ऑगस्ट २०२४ रोजी अहिल्यादेवी होळकर माध्यमिक विद्यालय, अहमदपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या शालेय तालुकास्तरीय योगा स्पर्धेमध्ये सम्राट चंद्रगुप्त मौर्य इंटरनॅश्नल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला होता त्या स्पर्धेमध्ये मयूर विष्णू नरवटे या खेळाडूने प्रथम क्रमांक पटकावला तसेच अर्जुन मारोती बर्वे याने द्वितीय क्रमांक तर मुलींमधून रोशनी सतीश नरवटे हिने प्रथम क्रमांक, संजीवनी रामदास जांभळकर हिने द्वितीय तर अनुष्का अंकुश देवकत्ते हिने तृतीय क्रमांक मिळविला. शाळेतील पाचही खेळाडूंची जिल्हास्तरीय शालेय योगासन स्पर्धेसाठी निवड झाली असून त्यांच्या या यशाबद्दल श्री.गणेश शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा.गणेशदादा हाके पाटील तथा मंडळाच्या सचिव श्रीमती रेखाताई हाके पाटील यांनी यशस्वीतांचे कौतुक केले तसेच शाळेचे संचालक मा.कुलदीप हाके पाटील व संचालिका सौ.शिवालिका कुलदीप हाके पाटील तथा मुख्याध्यापक हरिदास सर या सर्वांनी सुभेच्छा दिल्या. या विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी शाळेतील क्रीडा शिक्षक आकाश अरुण बनसोडे व मोसिन मोबीन अहमद शेख यांनी कठोर परिश्रम घेतले. तथा शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी खेळाडूंना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
