मुक्तांगण इंग्लिश स्कूलमध्ये राखी पौर्णिमा साजरी

0
मुक्तांगण इंग्लिश स्कूलमध्ये राखी पौर्णिमा साजरी

मुक्तांगण इंग्लिश स्कूलमध्ये राखी पौर्णिमा साजरी

लातूर (प्रतिनिधी) : विशाल नगर लातूर येथील मुक्तांगण इंग्लिश स्कूल मध्ये विद्यार्थ्यांनी राखी पौर्णिमा सण उत्साहात साजरा केला. या प्रसंगी प्राचार्या सुमेरा शेख यांची उपस्थिती होती.
मुक्तांगण इंग्लिश स्कूल मध्ये राखी पौर्णिमा सण साजरा केला. हा सण बहिण आणि भाऊ यांचे नाते सांगणारा सण म्हणून ओळखला जातो.भावाने बहिणेचे रक्षण करावे असा संदेश या दिवशी दिला जातो.भावाला बहिणीने राखी बांधल्यानंतर भाऊ बहिणीला भेटवस्तू देतो.शाळेतील मुलींनी आपल्या वर्गबंधुना राखी बांधून राखी पौर्णिमेचा सण शाळेमध्ये आनंदात साजरा केला.शाळेच्या शिक्षिका मयुरी देशमुख यांनी राखी पौर्णिमा सणाविषयी सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना दिली. या प्रसंगी सर्व विद्यार्थ्यांना शाळेतफॆऺ राखी पौर्णिमामेच्या शुभेच्छा देण्यात आल्या.सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या शिक्षिका प्रणिता कांबळे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!