ग्रामीण रूग्णालयात नेत्र तपासणीसह मोफत चष्म्याचे वाटप

0
ग्रामीण रूग्णालयात नेत्र तपासणीसह मोफत चष्म्याचे वाटप

ग्रामीण रूग्णालयात नेत्र तपासणीसह मोफत चष्म्याचे वाटप

अहमदपूर (गोविंद काळे) : शहरातील शासकीय ग्रामीण रुग्णालयातील नेत्र विभागाच्या वतीने लातुर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप ढेले यांच्या मार्गदर्शनाखाली दुर्धर आजाराने पिडीत असलेल्या रूग्णांची कॉम्प्युटर मशीनच्या साह्याने डोळ्यांची तपासणी करून ५० रुग्णांना मोफत नंबरच्या चष्म्याचे वाटप करण्यात आले. अहमदपूर शहरातील शासकीय ग्रामीण रुग्णालयात दिनांक 29 ऑगस्ट रोजी लातुर जिल्ह्याचे शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप ढेले यांच्या मार्गदर्शनाखाली नेत्र विभागाच्या वतीने दुर्धर आजाराने पीडित असणाऱ्या रूग्णांची कॉम्प्यूटर मशीनच्या साह्याने डोळ्यांची तपासणी करण्यात आली रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. बाळासाहेब नागरगोजे वैद्यकीय अधिकारी डॉ. जयप्रकाश केंद्रे यांच्या हस्ते ५० रूग्णांना नंबरच्या चष्म्याचे मोफत वाटप करण्यात आले निरोगी डोळे राहण्यासाठी काय काळजी घ्यावी याचे सखोल असे मार्गदर्शन नेत्रचिकित्सा अधिकारी राजू वाघमारे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आय सी टी सी चे समुपदेशक गणेश स्वामी व प्रयोग शाळा तंत्रज्ञ गणेश सूर्यवंशी यांनी सहकार्य केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed