अहमदपूर तालुक्यात सर्व दुर पाऊस सर्वत्र नदी नाल्यांना पूर

0
अहमदपूर तालुक्यात सर्व दुर पाऊस सर्वत्र नदी नाल्यांना पूर

अहमदपूर तालुक्यात सर्व दुर पाऊस सर्वत्र नदी नाल्यांना पूर

अहमदपूर (गोविंद काळे) : अहमदपूर तालुक्यात गेले 36 तास सर्वत्र पाऊस पडत असून, या पावसामुळे तालुक्यातील सर्व नदी नाल्यांना पूर आले आहेत मात्र पाऊस मध्यम स्वरूपाचा असल्याने कुठेही नुकसानीची बातमी नाही. अहमदपूर तालुक्यात आजपर्यंत सरासरी 727 मिलिमीटर पाऊस झाला आहे व तालुक्यात आज सरासरी 30 मिमी पाऊस झाला आहे.

तालुक्यात झालेल्या पावसाची मंडळ निहाय आकडेवारी खालील प्रमाणे आहे. अहमदपूर मंडळ आतापर्यंत 802 मिलिमीटर तर आज 33.3 मिलिमीटर, हाडोळती आतापर्यंत 776 मिलिमीटर व आज 34.8 मिमी., शिरूर ताजबंद आता पर्यंत पर्यंत 771 मिलिमीटर आज 24.5 मिमी, अंधोंरी आतापर्यंत 689 मिलिमीटर तर आज 33.3 मीलीमीटर, किनगाव आत्तापर्यंत 692 मिलिमीटर आज 20.8मीमी, खंडाळी आतापर्यंत 724 मी मी तर आज 33.3 मिलिमीटर एवढा पाऊस झाला आहे . आज सायंकाळपर्यंत ही आणखीन पाऊस चालूच आहे त्यामुळे हे पाणी पातळी व पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे.
काल आणि आज तालुक्यात होत असलेल्या पावसामुळे तालुक्यातील सर्व धरणे व तलाव पूर्णपणे भरलेली आहे यामुळे तालुक्यात च्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे व शेतीसाठी सुद्धा लागणाऱ्या पाण्याची चिंता संपली आहे. मात्र यानंतरही असाच पाऊस चालू राहिला तर हा पाऊस उभ्यापिकास नुकसानदायी ठरू शकतो ,सखोल भागातील पिके पाण्यामुळे नुकसानीत येऊ शकतात.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed