स्वप्निल जाधव यांच्या रूपाने उदगीर जळकोट विधानसभा मतदारसंघाला मिळाला सक्षम उमेदवार संघटन कौशल्याच्या बळावर उभी केली मोठी ताकद
लातूर (दयानंद स्वामी) : आगामी होऊ घातलेल्या विधानसभेच्या प्रत्येक पक्षाने आपली ताकत दाखवण्याचा प्रयत्न चालू केला आहे.उदगीर मतदार संघात प्रस्थापितांच्या विरोधात एका तरुण तडफदार व निष्कलंक अपक्ष उमेदवाराने सर्वच उमेदवारांसमोर तगडे आव्हान उभे केले आहे.सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून त्यांनी आपली नवीन ओळख या मतदारसंघाला करून दिली.नुकतेच त्यांना सामाजिक कार्याबद्दल पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.
प्रचंड जनसंपर्क आणि संघटन कौशल्य यांच्या बळावर त्यांनी सर्व प्रस्थापितांची झोप उडविली आहे.समाजातील तळागाळातील घटकांचे प्रश्न सोडविण्यासाठी ते सदैव तत्परतेने कार्यरत असल्यामुळे समाजामध्ये त्यांच्याबद्दल एक वेगळे कुतूहल व आकर्षण निर्माण झाले आहे.परिणामी आगामी विधानसभा निवडणुकीत यांचा फायदा त्यांना मिळेल असा विश्वास उदगीर जळकोट मतदारसंघातील मतदार व्यक्त करताना दिसत आहेत.
आज पर्यंत सर्वच पक्षांच्या उमेदवारांचे कार्य उदगीर जळकोट मतदार संघातील जनतेने बघितले आहे.यावेळी एका नवख्या व निष्कलंक उमेदवाराला साथ देण्याचा विचार मतदार संघातील जनता करताना दिसून येते.
स्वप्निल जाधव यांची मतदार संघात जनसंवाद यात्रा सुरू केली आहे.अर्थात हा जनसंवाद आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर असून थेट जनतेत जाऊन स्वप्निल जाधव आणि त्याचे सहकारी हे विधानसभेसाठी चाचपणी करत साखर पेरणी करत आहेत.शहर मतदार संघातून यांच्या जनसंवाद यात्रेला मोठा प्रतिसाद देखील मिळत आहे.या यात्रेच्या माध्यमातून स्वप्निल जाधव संपर्क वाढवत आहेत.थेट जनतेपर्यंत जात आहेत हे या यात्रेचे फलित नक्कीच म्हणता येईल किंवा त्यादृष्टीने त्याकडे पाहता येईल.किमान जनतेपर्यंत स्वप्निल जाधव,त्यांचे समर्थक आणि परिवार जात आहेत.स्वप्निल जाधव यांच्या या यात्रेच्या निमित्ताने ते जनतेपर्यंत किमान पोहचत आहेत, संपर्क करत आहेत.थेट जनतेत गेल्याने या यात्रेला आणखीन एक वेगळे महत्त्व प्राप्त झाले असे नक्कीच म्हणता येईल.या यात्रेत स्वप्निल जाधव हे शहर मतदारसंघातील जी ग्रामीण भागातील गावे आहेत त्याठिकाणी संध्याकाळी तर शहरातील जे प्रभाग आहेत त्याठिकाणी अनुक्रमे एक एक प्रभाग करून पूढे जात आहे.फिरत असताना धार्मिक स्थळांचे दर्शन,त्या भागातील नागरिकांच्या घरी चहा,स्वागत अशी यात्रा सध्या सुरू आहे.जी आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी आहे असे म्हणता येईल.यातून आपला दावा ते अधिक घट्ट करत आहेत असेही म्हणता येईल.मात्र सांगण्याचा उद्देश एकच की स्वप्निल जाधव यांचे नाव कायम चर्चेत आहे, राजकीय विश्लेषक असतील किंवा जूनी राजकारणी मंडळी ती देखील विधानसभा निवडणुकीसाठी जी जातीय, आर्थिक गणितं आवश्यक आहेत त्यात स्वप्निल जाधव तंतोतंत बसतात किंवा प्रभावी नाव आहे हे मान्य करतात.अर्थात एक अनेकांची वेगवेगळी मते असतात, एक मत होऊ शकत नाही.विरोध होतो तेथे राजकीय पक्षात एक मत होते कठीणच.त्यामुळे स्वप्निल जाधव यांना राजकीय असुरक्षिततेपोटी विरोध होणे,नाव ठेवणे हे प्रकार कायम सुरूच असतात.आणि आगामी विधानसभा निवडणुक पाहता स्वप्निल जाधव हे सर्व घेऊन थेट जनतेत जात आहेत.विशेष म्हणजे स्वप्निल जाधव यांनी आपली जनसंवाद यात्रा सुरू करण्यापूर्वी स्वप्निल जाधव यांच्या यात्रेच्या माध्यमातून थेट जनतेत गेल्याने त्यांनी एक प्रकारे आपली भूमिका स्पष्ट केली असा अर्थ त्याचा निघतो ज्याला जनतेने स्वीकारले असे देखील म्हणता येईल.स्वप्निल जाधव यांची यात्रा सुरू असून ते पूर्ण शहर मतदारसंघात फिरत आहेत.सोबत त्यांच्या शिवाय जाधव समर्थक देखील मोठ्या प्रमाणात असल्याने यात्रेला मोठे स्वरूप प्राप्त होतो आहे.सध्याची जनसंवाद यात्रेची स्थिती पाहता आणखीन बरेच चालणार आहे असे दिसत आहे,कारण आणखीन बरेच प्रभाग आणि गावे शिल्लक राहिली आहेत.मात्र या यात्रेतून थेट जनतेपर्यंत जात आपली आगामी राजकीय वाटचाल स्वप्निल जाधव स्पष्ट करत आहेत हे अगदी उघड आहे.