गुणवंतांच्या पाठीवर कौतुकाची थाप ऊर्जा देणारी ठरते – सौ उषा कांबळे

0
गुणवंतांच्या पाठीवर कौतुकाची थाप ऊर्जा देणारी ठरते - सौ उषा कांबळे

गुणवंतांच्या पाठीवर कौतुकाची थाप ऊर्जा देणारी ठरते - सौ उषा कांबळे

उदगीर (एल.पी.उगीले) : समाजामध्ये जे यशस्वी होतात, अशा गुणवंतांना आणखी पुढे जाण्यासाठी, प्रगती करण्यासाठी समाजाकडून त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली जावी. कारण ही कौतुकाची थाप त्यांना प्रगतीसाठी ऊर्जा देणाऱ्या ठरते. असे विचार काँग्रेस पक्षाच्या प्रदेश सरचिटणीस सौ. उषा कांबळे यांनी व्यक्त केले. त्या उदगीर तालुक्यातील हंगरगा येथील जेतवन बुद्ध विहारांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या धम्म संगोष्टी कार्यक्रमांतर्गत गुणवंत विद्यार्थ्यांच्या तसेच विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होत्या.
याप्रसंगी आदर्श गुप्ता आणि उल्हास सोनकांबळे हे दोन्ही विद्यार्थी तसेच पल्लवी विद्यासागर भाले यांनी नेट परीक्षेत यश मिळवल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला. तसेच शुभम उदगीरकर यांनी सीईटी परीक्षेत उज्वल यश मिळवले त्याबद्दल त्यांचा सत्कार शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ तसेच बुद्ध आणि त्यांचा धम्म हे पुस्तक देऊन गौरव करण्यात आला.
याप्रसंगी जेतवन बुद्ध विहार हंगरगा चे संस्थापक तथा अध्यक्ष मनोहर कांबळे, चंद्रकला कांबळे, विद्यासागर डोरनाळीकर, डॉ. माधव बुक्ते, दिलीप गायकवाड, सिद्धार्थ तलवारे, प्रशांत कांबळे, अतुल ससाने, राजेश्वर कांबळे, विद्यासागर भाले, डॉ. ज्योतीताई दीपक सोमवंशी, डॉ. धसवडकर, प्रदीप उदगीरकर, प्रवीण उदगीरकर यांच्यासह प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना सौ. उषा कांबळे म्हणाल्या की, समाजातील सर्व विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन आणि त्यांच्यामध्ये प्रेरणा निर्माण करतील अशा पद्धतीचे आदर्श विचार रुजवणे गरजेचे आहे. सकारात्मकता विद्यार्थ्यांच्या मनामध्ये निर्माण झाली तर आत्मविश्वास निर्माण होतो, आणि समाजामधील यशस्वी व्यक्तींनी त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिल्यास त्यांना आणखी उत्साह प्राप्त होतो. त्यामुळेच अशा पद्धतीच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन गरजेचे असते, असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण उदगीरकर यांनी तर आभार प्रदर्शन हंगरगा बुद्ध विहाराचे संस्थापक अध्यक्ष मनोहर कांबळे यांनी केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed