आ. अमित गोरखे व सचिन साठे यांचा स्वप्निल जाधव मित्र मंडळाच्या वतीने सत्कार संपन्न
उदगीर (प्रतिनिधी) : “दिव्यत्वाची जेथे प्रचिती, तेथे कर माझे जुळती” या बा.भ.बोरकर यांच्या कवितेप्रमाणे जे समाजासाठी झिजतात, समाजासाठी आदर्श असतात. अशा व्यक्तीच्या आदर्शाची जपवणूक केली जावी, आणि नव्या पिढीसमोर तो आदर्श उभा करावा. या विचाराने युवा नेते स्वप्निल जाधव यांनी आपल्या मित्र मंडळाच्या वतीने समाजभूषण आ. अमित गोरखे आणि साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नातू, मातंग समाजाच्या विकासासाठी प्रयत्न करणारे नेतृत्व सचिन साठे उदगीर येथे आले असता त्यांचा भव्य सत्कार स्वप्निल जाधव मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आला. याप्रसंगी मनोगत मांडताना स्वप्निल जाधव यांनी सांगितले की, समाजामध्ये जे आदर्श आहेत त्याची मी पूजा करतो. आणि नव्या पिढीच्या समोर हाच पायंडा पडावा, अशा उद्देशाने या सत्कार सोहळ्याचे आयोजन आपण केले. या दोन्ही महान विभूतीनी आमच्या स्वप्निल जाधव मित्रमंडळांचा सत्कार स्वीकारला, हे आम्ही आमचे भाग्य समजतो, असे विचार मांडले.
या प्रसंगी देऊळवाडी ग्रामपंचायतचे सदस्य दत्ताभाऊ बाळासाहेब जाधव, दादासाहेब देढे यांच्यासह स्वप्निल जाधव मित्र मंडळाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
समाजकार्य करत असताना तरुणांनी खचू नये, जीवनामध्ये कोणताही प्रसंग आला तरी लढा द्यायची हिंमत ठेवावी, आपले नैतिक बळ हेच आपल्याला विजयश्री मिळवून देते. त्यामुळे तरुणांनी उत्साहाने कामाला लागावे. असेही विचार याप्रसंगी स्वप्निल जाधव यांनी व्यक्त केले. कार्यक्रमासाठी स्वप्निल जाधव मित्र मंडळाच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले.