शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ग्रामीण जिल्हा कार्याध्यक्षपदी भास्कर भिलवंडे यांची नियुक्ती

0
शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ग्रामीण जिल्हा कार्याध्यक्षपदी भास्कर भिलवंडे यांची नियुक्ती

शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ग्रामीण जिल्हा कार्याध्यक्षपदी भास्कर भिलवंडे यांची नियुक्ती

नांदेड (गोविंद काळे) : शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नांदेड ग्रामीणचे कार्याध्यक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते भास्कर पाटील भिलवंडे यांची नियुक्ती प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली असून त्यांचे निवडीचे पत्र ३१ आगस्ट रोजी मुंबई येथे पक्ष कार्यालयात देण्यात आले आहे.

शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेल्या अनेक वर्षांपासून युवा नेते भास्कर भिलवंडे हे निष्ठेने काम करत आहेत. त्यांची ग्रामीण जिल्हाध्यक्ष म्हणून निवड होईल अशी चर्चा असताना माजी जिल्हा परिषद सभापती भगवानराव पाटील आलेगावकर यांची निवड करण्यात आली. त्यानंतर संपूर्ण नांदेड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यात प्रचंड नाराजी पसरली होती. युवा पदाधिकारी भास्कर भिलवंडे यांची ग्रामीण जिल्हाध्यक्ष म्हणून निवड केली नसल्याने पदाधिकारी नाराज असल्याची वार्ता शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना समजताच पक्षाने भास्कर भिलवंडे यांंचे पुनर्वसन करण्याचा निर्णय घेतला.
शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा पदाधिकारी भास्कर भिलवंडे यांच्यावर मोठी जबाबदारी सोपविण्याचा निर्णय घेतला. त्यांना तातडीने मुंबई येथे पाचारण करून ३१ आगस्ट रोजी दुपारी ४ वाजून ३० मिनिटाला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांना शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नांदेड ग्रामीण जिल्ह्याचे कार्याध्यक्ष म्हणून निवड केल्याचे पत्र दिले.

यावेळी पक्षाचे वरिष्ठ नेते तसेच युवक राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख, युवक जिल्हाध्यक्ष धनंजय सुर्यवंशी, कार्याध्यक्ष विक्रम नागशेट्टीवार, श्याम चोंडे, युवकांचे नायगाव अध्यक्ष गजानन पाटील होटाळकर, माधव कोरे उपस्थित होते.

विश्वासाला तडा जाऊ देणार नाही – भिलवंडे

शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, युवकांचे प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख, आमदार राजेश टोपे, निरीक्षक आशाताई भिसे यांनी माझ्या जो विश्वास टाकला आहे. त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. पक्षाचे निष्ठेने काम करुन पक्षाचे काम वाढविण्यासाठी मेहनत घेऊन जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काम वाढविण्यासाठी रात्रंदिवस कष्ट करण्याची ग्वाही नवनिर्वाचित कार्याध्यक्ष भास्कर भिलवंडे यांनी यावेळी दिली आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!