ज्ञानदीप अकॅडमीचे संचालक उद्धव इप्पर यांना रौप्य पदक

0
ज्ञानदीप अकॅडमीचे संचालक उद्धव इप्पर यांना रौप्य पदक

ज्ञानदीप अकॅडमीचे संचालक उद्धव इप्पर यांना रौप्य पदक

अहमदपूर (गोविंद काळे) : भारतातील बहुप्रतीक्षीत असलेली जे. बी. जी. सातारा हाफ हिल मॅरेथॉन स्पर्धा रविवारी दि. ३ सप्टेंबर रोजी सातारा येथे आयोजित करण्यात आली होती या स्प स्पर्धेत ज्ञानदीप अकॅडमीचे संचालक उद्धव इप्पर यांनी भाग घेऊन रौप्य पदक पटकावले आहे.

देशातील सर्वात खडतर आणि कठीण अशी ही मॅरेथॉन स्पर्धा मानली जाते. यंदाच्या मॅरेथॉनसाठी ७५०० स्पर्धकांनी आपली नावनोंदणी केली होती. देशातील सर्वात महत्त्वाची अशी ही मॅरेथॉन स्पर्धा मानली जाते. देश विदेशातील स्पर्धक या मॅरेथॉन स्पर्धेत भाग घेतात. ज्ञानदीप अकॅडमी चे संचालक उद्धव इप्पर यांनी या मॅरेथॉन स्पर्धेत २ तास १७ मिनीटांमध्ये तब्बल २१ कि.मी. चे अंतर पूर्ण करून रौप्यपदक प्राप्त केले आहे. त्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे. यापूर्वी त्यांना दैनिक एकमतने पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. रौप्य पदक व दैनिक एकमतचा पुरस्कार मिळाल्यामुळे आमदार बाबासाहेब पाटील, माजी मंत्री विनायकराव पाटील, भाजपा प्रवक्ते गणेश हाके पाटील, भाजपा जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख, माजी आमदार बब्रुवान खंदाडे, आयपीएस अधिकारी मंचकराव इप्पर, अकॅडमीचे प्रशिक्षक राम मेजर, जितेंद्र मेजर, नितीन गुट्टे, अर्चना करपे आदींनी अभिनंदन केले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!