औषध निर्माण अधिकारी लक्ष्मण (बाबा) कुलकर्णी यांचा सेवापुर्ती सत्कार सोहळा

0
औषध निर्माण अधिकारी लक्ष्मण (बाबा) कुलकर्णी यांचा सेवापुर्ती सत्कार सोहळा

औषध निर्माण अधिकारी लक्ष्मण (बाबा) कुलकर्णी यांचा सेवापुर्ती सत्कार सोहळा

अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील अंधोरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात औषध निर्माण अधिकारी पदावर कार्यरत असलेले लक्ष्मण ( बाबा ) विद्याधरराव कुलकर्णी यांच्या सेवापुर्ती निमित्त नुकतेच सत्कार सोहळ्याचे आयोजन प्राथमिक आरोग्य केंद्र अंधोरी येथे करण्यात आले होते.

शासकीय ग्रामीण रूग्णालय अहमदपूर अंतर्गत कार्यरत असलेल्या अंधोरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील औषध निर्माण अधिकारी लक्ष्मण ( बाबा ) विद्याधरराव कुलकर्णी यांची प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्ती झाली असल्यामुळे नुकतेच प्राथमिक आरोग्य केंद्र अंघोरी येथे सेवापुर्ती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वैद्यकीय अधिकारी डॉ.जयप्रकाश केंद्रे तर प्रमुख पाहुणे म्हणुन दराडे परमेश्वर, वाहुळे बाळासाहेब, फड नरहरी, धुळे महालिंग, श्रीमती चव्हाण ,शेख सलीम ,डंबाळे सोमेश्वर आदींची उपस्थिती होती. धुळे महालिंग यांनी “अंधोरीचे बाबा ” ही हृदयस्पर्शी कविता सादर केली . कुलकर्णी यांनी आपल्या मनोगतात जिवनात आलेल्या अनेक कठीण प्रसंगावर आपण कशी मात केली याविषयी मन मोकळे पणाणे बोलुन त्यांच्या कार्यकाळातील अनुभव सांगुन उपस्थितांना अनुभवाची शिदोरी दिली

यावेळी प्रा आ केंद्र अंधोरी येथील डॉ. यादव मॅडम, डॉ. शेंबाळे मॅडम, सर्व आरोग्य अधिकारी,कर्मचारी गावातील प्रतिष्ठित नागरिक, आप्तेष्ट, मित्र मंडळी माजी कर्मचारी आदींची उपस्थिती होती या सर्वांनी कुलकर्णी ( बाबा ) यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाळासाहेब वाहुळे यांनी केले सुत्रसंचलन दराडे परमेश्वर तर आभार प्रदर्शन नरहरी फड यांनी मानले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!