महाविद्यालयात हार्ड आणि सॉफ्ट कौशल्य संपादनाच्या संधी उपलब्ध – प्राचार्य डॉ. वसंत बिरादार

0
महाविद्यालयात हार्ड आणि सॉफ्ट कौशल्य संपादनाच्या संधी उपलब्ध - प्राचार्य डॉ. वसंत बिरादार

महाविद्यालयात हार्ड आणि सॉफ्ट कौशल्य संपादनाच्या संधी उपलब्ध - प्राचार्य डॉ. वसंत बिरादार

अहमदपूर (गोविंद काळे) : परिस्थितीवर न रडता दर्जेदार गुणवत्तेशी लढा द्या. महाविद्यालय हे मौजमजा करण्याचे ठिकाण नाही तर करियर घडविण्यासाठी आवश्यक असलेले हार्ड आणि सॉफ्ट कौशल्य प्राप्त करण्याच्या संधी उपलब्ध होतात असे प्रतिपादन ज्येष्ठ शैक्षणिक विचारवंत , समीक्षक तथा प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी केले.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, अहमदपूर येथील महात्मा फुले महाविद्यालयाच्या आय. क्यू. ए.सी. विभागांतर्गत ग्रंथालय विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या बी.ए. प्रथम वर्षातील नवप्रवेशित विद्यार्थ्यांच्या स्वागत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील हे होते. तर उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी यांच्यासह ग्रंथालय विभागाच्या सल्लागार समितीचे सदस्य प्रो. डॉ. अनिल मुंढे, डॉ. सतीश ससाणे, अजय मुरमुरे यांची किसान पिठावर प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोप प्रसंगी पुढे बोलतांना प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील म्हणाले की, महाविद्यालय हे करिअरच्या दृष्टिकोनातून स्वतःला माणूस म्हणून घडविण्याचे ठिकाण आहे . अगोदर स्वतःला घडवा तरच समाज आणि राष्ट्र घडेल हा मोलाचा संदेश ही त्यांनी दिला.
या कार्यक्रमाप्रसंगी उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी म्हणाले की, विद्यार्थ्यांनी आपल्या सुप्तगुणांना ओळखून आपले ध्येय निश्चित करून निरंतर प्रयत्न केल्यास जीवनात यश निश्चित मिळते. तसेच संधी विचारून येत नाही तर ती शोधावी लागते आणि मिळालेल्या संधीच सोनं करण्याचे ठिकाण हे महाविद्यालय आहे ‘त्याचबरोबर ते म्हणाले की, वाचनाने शब्द सामर्थ्य वाढते आणि कुठल्याही विषयावर सुंदर मांडणी करता येते , त्यातूनच विवेकी दृष्टिकोन निर्माण होतो असेही ते म्हणाले. या कार्यक्रमाप्रसंगी प्रो. डॉ. अनिल मुंढे यांनी ही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच आरती मंडले, शिवकन्या सुरनर व ऋतुजा सोनवणे या विद्यार्थिनींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी बी .ए. प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे वही, पेन आणि गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले .
तसेच क्रीडा विभागातील विद्यार्थ्यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत कंधार जि.नांदेड येथील श्री शिवाजी महाविद्यालयात घेण्यात आलेल्या अंतरमहाविद्यालयीन तलवारबाजी स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करून यश प्राप्त केल्याबद्दल प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी यशस्वी खेळाडू काकनाजी सुरनर , अश्विनी फड व सोनाली गायकवाड यांच्यासह क्रीडा संचालक प्रो. डॉ. अभिजीत मोरे यांचा सत्कार केला. याबरोबरच महाविद्यालय परिसरातील वृक्षांचे क्यू आर कोड निर्माण करणारे तंत्रज्ज्ञ डॉ. सचिन गर्जे यांचाही सत्कार केला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजक ग्रंथपाल प्रा. पी.एम. इंगळे यांनी केले तर सूत्रसंचालन डॉ . मारोती कसाब यांनी व आभार डॉ. बी.के. मोरे यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!