आंतर महाविद्यालयीन तलवारबाजी स्पर्धेत महात्मा फुले महाविद्यालयाचे दुहेरी यश
आंतर महाविद्यालयीन तलवारबाजी स्पर्धेत महात्मा फुले महाविद्यालयाचे दुहेरी यश
अहमदपूर (गोविंद काळे) : शिवाजी महाविद्यालय, कंधार येथे पार पडलेल्या आंतर महाविद्यालयीन तलवारबाजी स्पर्धेत येथील महात्मा फुले महाविद्यालयाच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत दुहेरी यश संपादन केले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड व शिवाजी महाविद्यालय, कंधार यांच्या संयुक्त विद्यमाने कंधार येथे आयोजित करण्यात आलेल्या आंतर महाविद्यालयीन तलवारबाजी स्पर्धेत महात्मा फुले महाविद्यालयाच्या अश्विनी फड हिने सेबर प्रकारात कांस्य पदक मिळविले तर सोनाली गायकवाड हिने सेबर प्रकारात कांस्यपदक मिळविले आणि विद्यापीठ स्तरावर मुलींच्या संघाने सर्व तृतीय स्थान मिळवले. काकनाजी सुरनर याने सेबर प्रकारात सिल्व्हर मेडल प्राप्त केले. तर मुलांच्या संघाने विद्यापीठ स्तरावर द्वितीय स्थान मिळवले.
या घवघवीत व दुहेरी यशाबद्दल किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीरंगराव पाटील एकंबेकर, सचिव पी. टी. शिंदे, उपाध्यक्ष माधवराव पाटील, सहसचिव हिरागीर गिरी, कोषाध्यक्ष गुंडेराव पाटील तसेच मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील, उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी यांनी सर्व यशस्वी खेळाडूंचे व त्यांना मार्गदर्शन करणारे महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ. अभिजीत मोरे यांचेही अभिनंदन केले आहे. सर्व यशस्वी खेळाडू व क्रीडा संचालक डॉ. अभिजीत मोरे यांचा प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या हस्ते महाविद्यालयात सत्कार करण्यात आला. यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
