अहमदपूर रनर्स ग्रुपला 03 गोल्ड 17 सिल्वर 07 ब्रांझ पदके; अहमदपूरचा दबदबा कायम
अहमदपूर रनर्स ग्रुपला 03 गोल्ड 17 सिल्वर 07 ब्रांझ पदके; अहमदपूरचा दबदबा कायम
गोल्ड मेडल पात्र श्री शेख लुल्ला, श्री वेंदान्त राठोड, श्री भुरे संतोष
अहमदपूर (गोविंद काळे) : दि.01 सप्टेंबर रोजी झालेल्या आतंरराष्ट्रीय सातारा हिल हाफ मॅरेथॉन 21km मध्ये अहमदपूर येथील अहमदपूर रनर्स ग्रुप मधील एकूण 28 रनर्सनी सहभाग घेतला होता.जगातील अगळी वेगळी व हिल खडतर व 06 सप्टेबर 2015 ला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मॅरेथॉन म्हणून नोंद असलेल्या सातारा हिल हाफ मॅरेथॉन प्रसिद्ध अशा मॅरेथॉन मध्ये अहमदपूर रनर्स ने पण आपला 28 रनर्स सह सहभाग नोंदवला.
पोलिस ग्राऊंड सातारा येथून सुरुवात होऊन पुढे यवतेश्वराच्या सरळ चढ असणाऱ्या घाटातून कास पठारे कडे जाणारा मार्ग असा हा रुट रनर्सची आपली क्षमता पणाला लावायला भाग पाडणारी अशा मॅरेथॉन मध्ये अहमदपूर रनर्स सुद्धा आपली क्षमता व आपला कस पनाला लावून अतिशय निसर्गरम्य,आल्हाददायक,घाटमाथ्याच्या दिशेने धावत आनंद घेत जगभरातील रनर्स या इव्हेंटला पसंती देतात.
या मॅरेथॉन मध्ये अहमदपूर रनर्स ग्रुप ला 3 गोल्ड मेडल,17 सिल्वर,05 ब्रांझ मेडल मिळाली.श्री संतोष भूरे,वेदांत राठोड ,लुल्ला शेख यांनी ग्रुपची कमान राखत अतिशय कमालीची कामगीरी दाखवत दोन तासाच्या आत 21km धावून गोल्ड मेडल मिळवले. बरुरे नामदेव, कदम आर डी, सरकाळे संजय, अलापूरे सुकेश या रनर्स अगदी थोडे व काही सेंकदाने त्यांचे गोल्ड मेडल नी हुलकानी दिली असे 17 रनर्सनी अतिशय उत्साह दाखवत सिल्वर मेडल कायम ठेवले. त्यात भरत ईगे, सुर्या साकोळे, सुडे हनमंत, संतोष देशमुख, गोकुळे निशांत, बॅगलवार सर, अजब सिंग, बरुरे सर, सरकाळे संजय, अलापूरे सुकेश, कदम आर डी अशा सतरा लोकांना सिल्वर मेडल मिळाले. व नवोदित सात रनर्स ना ब्रॉज पदक प्राप्त केले.
गेली अनेक वर्ष अहमदपूर रनर्समधीचे ग्रुप प्रमुख व सदस्य नामदेवजी बरुरे,धनंजय तोकले,भरतभाऊ इगे,दिपक वलसे,पवन पुरोहित,हनुमंत सुडे,संभाजी चोपणे हे अहमदपुर मॅरेथॉन क्रांती आणून व परिसरातील नव नवीन रनर्स ना प्रशिक्षित करने व त्यांना आरोग्यदायी व तंदुरुस्तीसाठी लोकांमध्ये जाग्रृकता निर्माण करण्यासाठी हा ग्रुप नेहमीच तत्पर असतो व यासाठी रनिंग च्या नवनवीन इव्हेंटच्या माध्यमातून स्वतः रनर्स इतर नवोदित रनर्स यात धावून अहमदपूर शहरात व परिसरात एक धावण्याची क्रांती निर्माण केली आहे. या पदकांनी अहमदपूर शहराचे नाव महाराष्ट्रात एक अनोखी ओळख निर्माण केली आहे. याचे कौतूक करून अहमदपूर व परिसरात शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.
