शास्त्री प्राथमिक शाळेत विशाखा नियमन समिती व महिला तक्रार निवारण समितीची बैठक संपन्न
उदगीर (प्रतिनिधी) : भारतीय शिक्षण प्रसारक संस्था,अंबाजोगाई द्वारा संचलित लालबहादुर शास्त्री प्राथमिक शाळेत विशाखा नियमन समिती व महिला तक्रार निवारण समितीची बैठक संपन्न झाली.
या बैठकीसाठी विशाखा नियमन समितीच्या अध्यक्षा भारतीय शिक्षण परिषद संस्थेच्या सभासद व माजी विद्यार्थीनी सौ.मोहिनी आचोले ,सचिव श्रीमती सुरेखाबाई कुलकर्णी व महिला तक्रार निवारण समितीच्या अध्यक्षा श्रीमती सुलभा कुलकर्णी ,महिला तक्रार निवारण समितीच्या कायम निमंत्रित सदस्या श्रीमती अंजलीताई अशोक नळगीरकर ,सर्व कार्यकारिणी सदस्या व शाळेतील सर्व महिला शिक्षिका उपस्थित होत्या.मुख्याध्यापक अंकुश मिरगुडे यांची विशेष उपस्थिती होती.
विशाखा समितीच्या सचिव श्रीमती सुरेखाबाई कुलकर्णी यांनी आपल्या प्रास्ताविकातून सध्या होत असलेले सामाजिक बदल ,कायदेविषयक जनजागृती व मुलींचे संरक्षण याविषयी विवेचन केले.
बैठकीमध्ये मुलींच्या सुरक्षेच्या दृष्टीने पालकांनी मुलींचे म्हणणे ऐकून घ्यावे,मुलींचे गट पाडावेत, वाहन चालकांची सर्व माहिती ठेवावी,मोबाईल वापराकडे लक्ष द्यावे,महिला पालक मेळावा या विषयावर चर्चा झाली.शाळेतील सर्व महिला शिक्षिकांनी आपापली मते मांडली.
मुख्याध्यापक अंकुश मिरगुडे यांनी शाळेत एकूण आठ सीसीटीव्ही व तक्रार निवारण पेटी बसवण्यात आल्याचे सांगितले.तसेच शाळेच्या वतीने मुलींच्या सुरक्षेसाठी प्राधान्याने ज्या काही उपाययोजना करता येतील त्या सर्व उपाययोजना करु असे आश्वासन दिले.
अध्यक्षीय समारोपप्रसंगी अध्यक्षा सौ.मोहिनी आचोले व श्रीमती सुलभा कुलकर्णी यांनी शाळेतील सीसीटीव्ही कॅमेरे व तक्रार पेटी बसवल्याबद्दल शालेय प्रशासनाचे आभार मानले. मुलींच्या सुरक्षेसंदर्भात एकही उणीव राहणार नाही याची काळजी घ्यावी, असे सांगितले.आभार ज्येष्ठ शिक्षिका सौ सविता बोंडगे यांनी मानले.