आजोबा गणपती बाल सार्वजनिक गणेश मंडळाच्या अध्यक्षपदी गादगे तर सचिव पदी बिराजदार यांची निवड
आजोबा गणपती बाल सार्वजनिक गणेश मंडळाच्या अध्यक्षपदी गादगे तर सचिव पदी बिराजदार यांची निवडआजोबा गणपती बाल सार्वजनिक गणेश मंडळाच्या अध्यक्षपदी गादगे तर सचिव पदी बिराजदार यांची निवड
अहमदपूर (गोविंद काळे) : शहरातील प्रथम मानाचा आजोबा गणपती बाल सार्वजनिक गणेश मंडळाची हिरक महोत्सव वर्ष ६० ची बैठक महादेव गल्ली येथे श्री गणेशाच पुजन करुन नुकतीच पार पडली असुन मंडळाच्या अध्यक्ष पदी गादगे तर सचिव पदी बिराजदार यांची निवड करण्यात आली
अहमदपूर शहरात दरवर्षी गणेश उत्सवा निमित्त प्रथम मानाचा आजोबा गणपती बाल सार्वजनिक गणेश मंडळ्याच्या गणपतीची प्रतिष्ठापणा केली जाते गणेश मंडळाचे यावर्षी ६० वे हिरक महोत्सवी वर्ष असल्यामुळे नुकतेच बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीत गणेश मंडळाच्या
अध्यक्ष पदी गजानन ब्रम्हानंद गादगे तर सचिव पदी शिवपुत्र बाबूराव प्रयाग(बिराजदार) यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली
त्याचप्रमाणे कार्याध्यक्ष पदी त्र्यंबक बस्वराज महाजन , कोषाध्यक्ष पदी प्रशांत नंदकिशोर पाटील , रोहित राजेश चौधरी,उपाध्यक्ष कृष्णा सुभाष गोरे व नचिकेत सुनिल बेंबळे, सहसचिव पदी गणेश रमेश मेनकुदळे आदींची निवड करण्यात आली बैठकीत दरवर्षीप्रमाणे विसर्जणाच्या दिवशी काढण्यात येणारी अतिशय भव्य दिव्य अशी मिरवणूक तसेच दररोज सामाजिक, सांस्कृतिक,धार्मिक कार्यक्रम घेण्याचा सर्वांनी मानस केला
गणेश मंडळावर निवड झालेल्या सर्वांचे हार्दिक अभिनंदन करून शुभेच्छा देण्यात आल्या
यावेळी उपस्थित मंडळाचे माजी अध्यक्ष, मार्गदर्शक माधवराव पुणे, शिवकुमार उटगे, प्रा.विश्वाबर स्वामी सर, रामलिंग तात्तपुरे सर, सुनील कोरे,महालिंग पुणे,शिवकुमार बेंद्रे,राजकुमार कोरे,सचिन कादवादे,व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
