भाजपचे लातूर शहर जिल्हाध्यक्ष देवीदास काळे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा
भाजपचे लातूर शहर जिल्हाध्यक्ष देवीदास काळे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा
लातूर (प्रतिनिधी) : भाजपचे लातूर शहर जिल्हाध्यक्ष देवीदास काळे यांचा वाढदिवस आज 5 सप्टेंबर रोजी लातूर शहरातील विविध भागात विविध सामाजिक उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी देवीदास काळे यांनी अंबाजोगाई रोडलगत असलेल्या मातोश्री आश्रमाला भेट देवून तेथील वृद्धांसोबत अल्पोपहार घेवून त्यांचे आर्शिवाद घेतले. त्यानंतर त्यांनी कॉक्सीट कॉलेजवळील श्री गुरुगणेश जीवनराज जैन गोरक्षण संस्थेत जाऊन गो मातेला चारा दिला. तसेच ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिर येथे जाऊन मनोभावे दर्शन घेतले श्री सिद्धेश्वर महाराजांचा अभिषेक केला. तसेच सुरत शहावली दर्गा येथे जाऊन चादर चढवण्यात आली. गंजगोलाई येथील जगदंबादेवी, बालाजी मंदिर व रामलिंगेश्वर मंदिर येथे जाऊन देवीदास काळे यांच्या हस्ते पूजा व आरती करण्यात आली. शासकीय रुग्णालयातील रुग्णांना फळे वाटप करून रुग्णांच्या नातेवाईकांना अन्नदान करण्यात आले. प्रभाग 1 मध्ये विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला. महात्मा गांधी चौकात वृक्षारोपण, कातपूर रोड येथील मतिमंद विद्यार्थ्यांना फळे व खाऊ वाटप करण्यात आले. दरम्यान लातूर शहरातील विविध भागात वाढदिवसानिमित्त भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी वृक्षारोपण, शालेय साहित्य वाटप, अनाथ मुलांना गणवेश वाटप, गोशाळा येथे गो मातेला चारा वाटप, लाडक्या बहिणींचा सन्मान यांसह अनेक सामाजिक कार्यक्रम घेण्यात आले.
रामलिंगेश्वर मंदिरात मुख्य अभिष्टचिंतन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या ठिकाणी शहर व जिल्ह्यातील असंख्य मान्यवरांनी देवीदास काळे यांना पुष्पहार, बुके देवून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच विशेष म्हणजे देवीदास काळे यांच्या हस्ते महिलांना इ श्रम कार्ड वाटप करण्यात आले. यावेळी भाजपचे माजी खासदार डॉ. सुनिल गायकवाड, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष ॲड. गणेश गोमचळे, आबाजी चौगुले, माजी उपमहापौर दिपक सूळ, माजी नगरसेवक रवी सूडे, सरचिटणीस शिरीष कुलकण, प्रवीण कस्तुरे, मीनाताई भोसले, रागिणीताई यादव, गोपाळ वांगे, अजय भूमकर, चंद्रकांत खटके , संजय गिर , ललित तोष्णीवाल, अभिजीत मुनाळे, राहुल भुतडा, संतोष तिवारी, आबेद सय्यद, व्यंकटेश सरवदे, बालाजी मारकडे, राजकुमार गोजमगुंडे, बाबा कांबळे, भरत लोंढे राजकुमार सोनवणे तसेच भाजपचे पदाधिकाऱ्यांसह शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर, डॉक्टर्स, वकिल, पत्रकार, व्यापारी, श्री रामलिंगेश्वर समिती, शहरातील विविध संस्था, संघटना यांच्या वतीने देवीदास काळे यांना प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा देण्यात आल्या.
