शशीकुमार पाटील यांना पुंडलिकराव नादरगे स्मृती उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार

0
शशीकुमार पाटील यांना पुंडलिकराव नादरगे स्मृती उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार

शशीकुमार पाटील यांना पुंडलिकराव नादरगे स्मृती उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार

उदगीर (प्रतिनिधी) : येथील डॉ. राधाकृष्णन प्राथमिक विद्यालयातील शिक्षक शशीकुमार काशिनाथ पाटील यांना संस्थेअंतर्गत दिला जाणारा पुंडलिकराव नादरगे स्मृती उत्कृष्ट शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी त्यांना शाल, स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काशिनाथराव पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक विश्वनाथराव मुडपे गुरुजी ,सेवानिवृत्त आदर्श शिक्षक सूर्यकांतराव पांचाळ , शोभाताई पाटील, संस्था सचिव देविदासराव नादरगे यांची उपस्थिती होती. विश्वनाथराव मुडपे गुरुजी यांनी शिक्षकांचे आपल्या जीवनातील महत्त्व याबद्दल मार्गदर्शन केले, तर संस्था सचिव देविदासराव नादरगे यांनी शिक्षक दिनाचे महत्त्व सांगत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी भाषणे केली. शिक्षक दिनाचे औचित्य साधून मान्यवरांच्या हस्ते शाळेतील शिक्षकांना पुष्प देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोहित बिराजदार यांनी केले ,तर आभार मु. अ. ज्ञानोबा कुंडगिरे यांनी मानले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रशांत पांचाळ, विठ्ठल नादरगे, गोविंद रावळे, वर्षाताई पाटील, प्रफुलता बोडके, मनोरमा तेलंगे , सुनिता शिंदे, आम्रपाली सोमवंशी यांनी परिश्रम घेतले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!