शास्त्री शाळेत पर्यावरणपूरक गणेशमूर्ती कार्यशाळा संपन्न.
शास्त्री शाळेत पर्यावरणपूरक गणेशमूर्ती कार्यशाळा संपन्न.
उदगीर (प्रतिनिधी) : भारतीय शिक्षण प्रसारक संस्था,अंबाजोगाई द्वारा संचलित लालबहादुर शास्त्री प्राथमिक विद्यालयात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून कलोपासक मंडळातर्फे पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनविणे कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.या कार्यशाळेसाठी अध्यक्ष म्हणून पहिली,दुसरी विभागाच्या विभाग प्रमुख श्रीमती सुरेखाबाई कुलकर्णी,प्रमुख पाहुणे म्हणून सौ.अर्चना सुवर्णकार, कलोपासक मंडळ प्रमुख सौ.सोनिया देशपांडे उपस्थित होत्या.
पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनविणे कार्यशाळेतून निश्चितच पर्यावरणाचे रक्षण होणार आहे.याविषयी सविस्तर मार्गदर्शन सौ.अर्चनाताई सुवर्णकार यांनी केले.
शाडूच्या मातीपासून गणेशमूर्ती कशी बनवावी याचे प्रात्यक्षिक सौ.सोनिया देशपांडे यांनी करून दाखवले.पहिली, दुसरी विभागातील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी खूप छान प्रकारे गणेशमूर्ती बनवून सादर केल्या.कार्यक्रमाच्या अध्यक्षा श्रीमती सुरेखाबाई कुलकर्णी यांनी अश्या उपक्रमातून निश्चितच विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला चालना मिळेल, पर्यावरणाच्या रक्षणासाठी आणखी काय काय करता येईल,याबद्दल विद्यार्थ्यांशी चर्चा केली.पर्यावरणाच्या रक्षणासाठी आपण आग्रही राहण्याचे आवाहन केले.
