शिवाजी महाविद्यालयास नॅक कमिटीची भेट

0
शिवाजी महाविद्यालयास नॅक कमिटीची भेट

शिवाजी महाविद्यालयास नॅक कमिटीची भेट

उदगीर (प्रतिनिधी) : बेंगलोर येथील राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषद(नॅक) समितीने शिवाजी महाविद्यालयात नुकतीच भेट दिली. या समितीमध्ये नॉलेज कंन्सोर्टियम गुजरात येथील माजी संचालक प्रो.डाॅ.नरेंद्र चौटालिया, तामिळनाडू येथील अंजा कॉलेज शिवकाशी चे माजी प्राचार्य प्रो.डॉ. पंड्याराजन वाल्लीमुथू यांची उपस्थिती होती. महाविद्यालयाचे हे तिसरे मूल्यांकन होते. ही समिती शिक्षणाच्या गुणवत्तेतील बिघाडाच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी कार्य करते. याची स्थापना 1994 मध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या शिफारशींना प्रतिसाद म्हणून करण्यात आली. महाविद्यालयाचे प्राचार्य, उप प्राचार्य आयक्यूसी चे समन्वयक यांनी याप्रसंगी त्यांचा येथे सत्कार केला. त्यानंतर समितीने विविध प्राधिकरणाला भेटी दिल्या, प्रेझेंटेशन पाहिले, महाविद्यालयाचे मूल्यांकन केले. महाविद्यालयाच्या वतीने त्यांचे स्वागत प्राचार्य डॉ .अरविंद नवले, उपप्राचार्य डॉ .आर.एम. मांजरे,आयक्वेशीचे समन्वयक डॉ.विष्णू पवार यांनी केले. यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी , शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!