आगामी काळातील सणासुदीच्या उत्सवामुळे हरभरा डाळ ८० वरुन १२० रुपयांवार

0
आगामी काळातील सणासुदीच्या उत्सवामुळे हरभरा डाळ ८० वरुन १२० रुपयांवार

आगामी काळातील सणासुदीच्या उत्सवामुळे हरभरा डाळ ८० वरुन १२० रुपयांवार

आवक कमी झाल्याने दरवाढ झाली असल्याची किराणा व भुसार विक्रेत्यांची माहीती

अहमदपूर (गोविंद काळे) : गेल्या महिनाभरापासून आवक घटल्याने हरभरा डाळीचे भाव ८० रुपये किलो वरून १२० रुपये किलोवर पोहोचले आहे. तसेच बेसन पिठाचे दरही १०० वरून १२० रुपये किलो झाले आहेत. आगामी एक ते दीड महिना ते आणखी वाढण्याची शक्यता विक्रेत्यांनी वर्तवली आहे.
सण-उत्सवांमुळे सध्या महिला स्वयंपाकघरात वेगवेगळी व्यंजने बनवण्यात व्यग्र आहेत. त्यामुळे रोजच्या आहारात समावेश असलेल्या डाळी, साखरीचे दर वाढल्याचे समोर आले आहे. आगामी काही काळात येणाऱ्या अनेक सणांमुळे तसेच आवक कमी झाल्याने ही दरवाढ झाल्याचे किराणा व भुसार विक्रेत्यांकडून सांगण्यात येत आहे.
महिनाभरातच हरभरा डाळ ८० रुपये किलोवरून १२० रुपये किलो तर शेंगदाणे १२० ते १३० रुपये किलोपर्यंत जाऊन पोहोचले आहेत. हरभरा डाळीचे दर वाढल्याने बेसन पीठ १०० रुपयांवरून १२० रुपये किलोवर पोहोचले आहे.
साखर ४० वरून ४४ रुपये किलोपर्यंत महागली आहे. तूरडाळही महाग होऊन १६० रुपये किलोवर पोहोचली. यामुळे डाळवर्गीय पिकांचे अपेक्षित उत्पादन हाती न पडण्याची शक्यता लक्षात घेत साठेबाजी सुरू झाल्याने डाळीचे दर महागण्यास सुरुवात झाली आहे. तसेच तेलाच्या दरातही येत्या
महिनाभरात वाढ होण्याचा अंदाज विक्रेत्यांनी वर्तवला आहे. मसाल्यात गणना होत असलेली विलायची सर्वाधिक महागली आहे. त्यात किलोमागे पाचशे रुपयांनी वाढ झाली आहे.
गेल्या महीण्यात विलायचीचे दर दोन हजार रुपये किलो होते. तर आता ते दोन हजार पाचशे रुपये किलो झाले आहे. दुसरीकडे कापूर ८५० रुपयांवरून थेट १२५० रुपये किलो झाले आहे.

साखर, शेंगदाणेही महाग…
सध्या डाळीची आवक घटली आहे. तसेच सण उत्सवाच्या दिवसांना सुरुवात झाल्याने, दररोजच्या आहारातील डाळ, साखर, शेंगदाणे, विलायची आदी वस्तूंच्या किंमती वाढल्या आहेत. येणाऱ्या काळात दर आणखीन वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

गजानन डुब्बेवार , व्यापारी आकाश किराणा अहमदपूर

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed