जिल्ह्यातील पीक नुकसानीचे पंचनामे करा : सचिन दाने
लातूर (दयानंद स्वामी) : जिल्ह्यात गेल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे, लातूर, रेणापूर,औसा तालुक्यातील शेतीचे शेतकऱ्यांचे नुकसान झाली आहे पिकांचे नुकसान, पशुधन जीवितहानी, घरांची गोठ्यांची पडझड झाली आहे. विद्युत पोलांचे, शेतीचे नुकसानी बाबतची माहिती घेऊन नुकसानीचे पंचनामे करून, मदतीची कार्यवाही करून सुविधा देण्यात याव्यात. तसेच पिक विमा कंपनी शेतकऱ्यांना नुकसान अर्ज करण्यास आपले कार्यालय तालुका, जिल्हा स्तरावर कार्यरत करावे, अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन दाने यांनी जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे केली आहे. सध्या पिक विमा कंपनीचे कुठेही कार्यालय नसून त्याचा संपर्क होत नाही. संबंधित कृषी आणि पिक विमा अधिकाऱ्यांना तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश द्यावेत असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.