कै. रसिका महाविद्यालयास ‘NAAC’ कडून ब ++ दर्जा प्राप्त

0
कै. रसिका महाविद्यालयास 'NAAC' कडून ब ++ दर्जा प्राप्त

कै. रसिका महाविद्यालयास 'NAAC' कडून ब ++ दर्जा प्राप्त

देवणी (प्रतिनिधी) : देवणीच्या शैक्षणिक प्रगतीत मोलाचे योगदान देणाऱ्या कै. रसिका महाविद्यालयास विद्यापीठ अनुदान आयोगाची स्वायत्तसंस्था ‘राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषद’ ( National Assessment and Accreditation Council- NAAC ) कडून ब ++ (CGPA 2.81) दर्जा देण्यात आला. NAAC मूल्यांकन समितीचे अध्यक्ष प्रा.डॉ.ए.एस.नागज्योती कोरिपेला ( प्र-कुलगुरू : भारतीय अभियांत्रिकी विज्ञान आणि तंत्रज्ञान इनोव्हेशन युनिव्हर्सिटी, आंध्र प्रदेश), सदस्य समन्वयक
डॉ.महावीर बी. कोथळे (जी.आय. बागेवाडी, कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय,निपाणी, कर्नाटक), NAAC पीअर टीमचे सदस्य डॉ. के. करुणाकरन (प्राध्यापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, हिंदुस्थान शैक्षणिक संस्था, कोईम्बतूर, तामिळनाडू) या त्रिसदस्यीय समितीने महाविद्यालयाची पाहणी करून समाधान व्यक्त केले. शैक्षणिक वर्ष 2012 – 13 मध्ये अनुदान प्राप्त केलेल्या या महाविद्यालयाने केवळ बारा वर्षाच्या वाटचालीमध्ये दोन वेळा NAAC मूल्यांकन केले. पहिल्यावेळी 2017 मध्ये ‘B’ दर्जा प्राप्त केल्यानंतर यावर्षी शैक्षणिक गुणवत्ता व प्रगतीमध्ये भरीव योगदान देऊन ब++ (B++) हा दर्जा प्राप्त केला. महाविद्यालयाने शैक्षणिक प्रगतीचा आलेख उंचावत ठेवला आहे. ग्रामीण भागातील व सीमावर्ती भागातील शेतकरी, शेतमजुरांच्या विशेषतः मुलींच्या शैक्षणिक प्रगतीसाठी सतत उपक्रमशील योजना राबवून या महाविद्यालयाने NAAC समितीचे लक्ष वेधून घेतले. यामुळे महाविद्यालयास हे यश संपादन करता आले. नॅकच्या मूल्यांकनासाठी संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. गोविंदरावजी भोपणीकर साहेब, संस्थासचिव मा. श्री. गजाननजी भोपणीकर साहेब, प्राचार्य डॉ. चंद्रकांत जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेऊन मोलाचे योगदान दिले. दिनांक ३० व ३१ ऑगस्ट रोजी नॅकच्या समितीने संस्थाअध्यक्ष, सचिव, महाविद्यालयातील माजी विद्यार्थी, पालक, सर्व कर्मचारी यांची संवाद बैठक घेऊन व सर्व विभागास भेटी देऊन महाविद्यालयाच्या एकूण शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेतला. सर्व भौतिक सोयी सुविधांची पाहणी केली. तसेच महाविद्यालयाच्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडाविषयक व संशोधन इत्यादी उपक्रमाचा आढावा घेऊन समाधान व्यक्त केले. नॅक मूल्यांकनाच्या यशस्वीतेसाठी नॅक समन्वयक प्रा. डॉ. महादेव टेंकाळे तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी यांच्या सहकार्याने महाविद्यालयाने नॅक मूल्यांकन पूर्ण केले. महाविद्यालयाच्या या यशाबद्दल देवणी व परिसरातील सर्व शिक्षक, विद्यार्थी व पालक वर्गाकडून महाविद्यालयाचे कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed